अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. आज तिथीनुसार त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. यानिमित्त अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लेकासाठी आणि सूनेसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

लग्नाआधी अनेक वर्षे शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्याने विराजसच्या कुटुंबियांशीही शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. मृणाल कुलकर्णी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांबद्दल असलेल्या प्रेम वेळोवेळी व्यक्त करत असतात. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं. मृणाल कुलकर्णी यांनी एक पोस्ट लिहित त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे

आणखी वाचा : मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “त्याची चव…”

विराजस आणि शिवानीच्या लग्नातले दोन फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “प्रिय शिवानी आणि विराजस, आज अक्षय तृतीया. तिथी नुसार तुमच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस !!! एक वर्ष झालं सुद्धा !!! अशीच वर्षं पटापट निघून जातील आणि मग आम्हा सगळ्यांसारखे तुम्ही पण म्हणाल, बापरे इतकी वर्ष झाली? कमालच्चे !!! खूप स्वप्नं बघा आणि ती पुरी करण्यासाठी भरपूर कष्ट करा ! आनंदी राहा ! खूप खूप प्रेम !!”

हेही वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत त्यांचे आणि विराज-शिवानीचे चाहते त्या दोघांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader