Mrunal Dusanis New Restaurant : मृणाल दुसानिसने नुकतंच आपल्या नवऱ्याच्या साथीने ठाण्यात नवीन हॉटेल सुरू केलं. अभिनेत्री गेल्या ४ वर्षांपासून कलाविश्वापासून दूर होती. मात्र, मार्च महिन्यात भारतात परतल्यावर मृणालने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. अभिनेत्रीच्या नव्या रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी अनेक मराठी कलाकार पोहोचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ अशा लोकप्रिय मालिकांमधून मृणाल दुसानिस घराघरांत पोहोचली. करिअरच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं. यानंतर काही वर्षे मालिकाविश्वात काम करून २०२० मध्ये मृणाल अमेरिकेला गेली. यावर्षी मार्च महिन्यात मृणाल आपला पती नीरज आणि लेक नुर्वीबरोबर भारतात परतली. आता येत्या काही दिवसांत ती नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, वैयक्तिक आयुष्यात मृणाल नवऱ्याच्या साथीने बिझनेसवुमन सुद्धा झाली आहे.

हेही वाचा : पतीचं स्वप्न अन् मृणालची खंबीर साथ! अमेरिकेहून भारतात आल्यावर रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय का घेतला? अभिनेत्री म्हणाली…

मृणालने ठाण्यात ‘बेली लाफ्स’ हे नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. शशांक केतकर खास मैत्रिणीच्या नव्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी गेला होता. तिच्या नव्या हॉटेलचा व्हिडीओ शेअर अभिनेत्याने खास पोस्ट लिहिली आहे. शशांक लिहितो, “मृणाल आणि नीरज खूप खूप अभिनंदन…मी कल्पना करू शकतो की, तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते साध्य करण्यासाठी तुम्ही काय-काय केलं असेल. कारण, स्वप्न सत्यात उतरवण्यासठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी घाम गाळावा लागतो…मेहनत, जिद्द असावी लागते.”

शशांकप्रमाणे अभिनेत्रीच्या नव्या रेस्टॉरंटला विदिशा म्हसकर, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती, वंदना गुप्ते, आकांशा गाडे, ज्ञानदा रामतीर्थकर या कलाकार मंडळींनी देखील भेट दिली आहे. विदिशा रेस्टॉरंटला भेट दिल्यावर लिहिते, “तुम्ही सर्वांनी इथे नक्की जा…कारण, तुम्ही सगळे या ठिकाणचे चविष्ट पदार्थ खाऊन नक्की तृप्त व्हाल.”

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झाली बिझनेसवुमन! ‘या’ अभिनेत्याच्या साथीने सुरू केला हटके व्यवसाय; पाहा झलक

हेही वाचा : Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Mrunal Dusanis New Restaurant

दरम्यान, मृणालच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम!’ या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal dusanis new restaurant shashank ketkar write special post also these actors visit her new hotel sva 00