Mrunmayee Deshpande Wedding Anniversary : मराठी कलाविश्वात आपला अभिनय व नृत्याचा एक वेगळा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला ओळखलं जातं. तिचं सूत्रसंचालन सुद्धा प्रेक्षकांना तेवढचं भावतं. रुपेरी पडद्यावर स्वत:ची एक वेगळी छाप उमटल्यावर मृण्मयी वैयक्तिक आयुष्यात ३ डिसेंबर २०१६ मध्ये लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाला आज ८ वर्षं पर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्रीने आपल्या नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

मृण्मयीने २०१६ मध्ये स्वप्नील रावशी लग्न केलं. या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. घरच्यांनी स्थळ पाहिल्यावर मृण्मयी आणि स्वप्नील एकमेकांना भेटले. या दोघांची एकमेकांशी ओळख झाल्यावर यांचे सूर जुळले, भेटीगाठी वाढल्या आणि कालांतराने मृण्मयी-स्वप्नीलने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आज अभिनेत्री तिच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहे.

tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो
Nana Patekar recalls memories of smita patil
“स्मितामुळे मी सिनेमात आलो, नाहीतर…”, नाना पाटेकरांचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता? सांगितली ४६ वर्षांपूर्वीची आठवण
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नव्या मालिकेसाठी होणार बदल! ‘साधी माणसं’ची वेळ बदलणार, तर ‘ही’ मालिका घेणार निरोप

मृण्मयी देशपांडेची नवऱ्यासाठी खास पोस्ट

मृण्मयी ( Mrunmayee Deshpande ) नवऱ्याला शुभेच्छा देताना लिहिते, “८ वर्ष… स्वप्नील, गेली ९ वर्षे आपण एकमेकांना ओळखतो…त्यात सहजीवनाची ही ८ वर्षे. या संपूर्ण काळात आपल्या नात्यात कधीच कंटाळवाणा क्षण आला नाही. ही सगळी वर्षे अत्यंत सुंदर होती. माझं तुझ्यावर खूप प्रेम आणि त्यापेक्षाही मला तुझा प्रचंड अभिमान आहे. आपण निवडलेला मार्ग निश्चितच सोपा नाहीये. पण, हे क्षण मी तुझ्याशिवाय अन्य कोणाबरोबरही अनुभवू शकत नाही. आयुष्यात असेच सुंदर क्षण एकत्र घालवूयात… आय लव्ह यू.” मृण्मयीच्या या पोस्टवर चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कमेंट्स करत या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : “पवनने ज्याप्रकारे माझा हात घट्ट…”, रेश्मा शिंदेचा सासरी थाटात गृहप्रवेश! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, मृण्मयी ( Mrunmayee Deshpande ) सध्या मुंबई सोडून महाबळेश्वरमध्ये तिच्या नवऱ्याबरोबर राहते. या जोडप्याने निसर्गाच्या सानिध्यात महाबळेश्वरमध्ये सुंदर असं घर बांधलं आहे. याच ठिकाणी दोघांनी ‘नील अँड मोमो’ नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही शेतात एकत्र काम करून नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देत आहेत. २०२० पासून मृण्मयी मुंबई सोडून महाबळेश्वरला स्थायिक झाली. त्यांच्या शेतातील सुंदर फोटो व व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते.