‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवणारी अन् ‘माझा होशील ना’ मधून घराघरात पोहोचलेली गौतमी देशपांडे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका फोटोमुळे तिचं अभिनेता स्वानंद तेंडुलकरबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक ठिकाणी तिला याबाबत विचारण्यात आलं. पण तिने मौन पाळलं. अखेर काल गौतमीने प्रेमाची कबुली दिली. मेहंदी सोहळ्यातील फोटो शेअर करत प्रेम जाहीर केलं. सध्या या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
मेहंदी सोहळ्यासाठी गौतमीने खास गुलाबी, पिवळा, निळा रंगाचा लेहेंगा घातला होता. ज्यामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. तसंच स्वानंदने गुलाबी रंगाचं जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघांचा मेहंदी सोहळ्यातील हा लूक चांगला चर्चेत आला आहे. दरम्यान, या सोहळ्यात गौतमीची मोठी बहीण आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ ‘के२ फॅशन क्लोसेट’ या इन्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – Premachi Goshta: धमाल, मस्ती अन् बरंच काही….; पाहा सागर-मुक्ताच्या लग्नाचा BTS व्हिडीओ
मृण्मयीने बहिणीच्या मेहंदीसाठी खास खणाची परकर चोळी घालून दाक्षिणात्य लूक केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मृण्मयी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तसेच ती गौतमीबरोबर डान्स करताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – अमित भानुशाली तेजश्री प्रधानची आहे जुनी ओळख, तर जुईचं आहे ‘हे’ खास नातं; वाचा यांच्या ऑफस्क्रीन बॉन्डविषयी…
गौतमी देशपांडेचा होणारा नवरा काय करतो?
मराठीमधलं पहिलं डिजिटल चॅनेल ‘भाडिपा’चा बिझनेस हेड गौतमीचा होणारा नवरा स्वानंद तेंडुलकर आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २५ डिसेंबर गौतमी स्वानंदबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.