‘एमटीव्ही रोडीज’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणाऱ्या रिएलिटी शोपैकी एक आहे. एमटीव्ही रोडीजचा १९वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. ‘रोडीज : कर्म या कांड’ असं रोडीजच्या नव्या सीझनचं नाव असणार आहे.

रोडीज या शोप्रमाणेच त्यातील गँग लीडरलाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. प्रिन्स, नेहा धुपिया, रणविजय सिंग, निखिल, रफ्तार या रोडीजच्या गँग लीडरला विशेष लोकप्रियता मिळाली. यंदाच्या सीझनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गँग लीडर म्हणून दिसणार आहे. रोडीजकडून नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

हेही वाचा>> Video: केक कापला, मिठी मारली, किस केलं अन्…; अंकिता लोखंडेचा पतीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

एमटीव्ही रोडीजच्या या नव्या प्रोमोमध्ये रिया चक्रवर्ती अॅक्शन करताना दिसत आहे. “तुम्हाला काय वाटलं…मी परत नाही येणार?…मी घाबरले?…आता घाबरण्याची वेळ दुसऱ्यांची आहे,” असं रिया व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. रियाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत खिल्ली उडवली आहे. “रोडीजला फ्लॉप करायला आली, ” अशी कमेंट केली आहे. “हे रोडीजवाले वेडे झाले आहेत का? कोणी दुसरं भेटलं नाही का?,” असंही म्हटलं आहे.

हेही वाचा>>प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या दोन्ही बहिणी आहेत फौजी, वडिलही होते लष्कर अधिकारी; फोटो शेअर करत म्हणाली…

mtv rodies rhea chakraborty

“सुशांत सिंह राजपूतचं काय झालं? आधी हे हिला विचारा” असं एकाने म्हटलं आहे. “रोडीजचा दर्जा खराब झाला आहे,” अशी कमेंटही केली आहे.

mtv rodies rhea chakraborty

“हा सीझन सगळ्यात वाईट असेल”, असंही म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने “रोडीज फ्लॉप होणार आहे,” अशी कमेंट केली आहे.

mtv rodies rhea chakraborty

“रोडीजसाठी मी आतुर होतो, पण हिच्यामुळे सगळी उत्कंठा संपली,” अशीही कमेंट केली आहे.

mtv rodies rhea chakraborty

दरम्यान, रोडीजच्या नव्या सीझनसाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या शोसाठी प्रेक्षक आतुर आहेत. ‘रोडीज १८’मध्ये आशीष आणि नंदिनीमध्ये चांगलीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ‘रोडीज’च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन विजेते घोषित करण्यात आले. नंदिनी आणि आशीष जिंकल्यानंतर त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये, ट्रॉफी अन् काही खास भेटवस्तू देण्यात आल्या होत्या.