‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकेत नुकतीच दिशा म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदेची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली. ५ आलिशान गाड्या, ११ बॉडीगार्ड्स आणि वेस्टर्न लूकमध्ये दिशाची एन्ट्री झाली. यामुळे किर्लोस्कर कुटुंबासह पारूला धक्काच बसला. तीन महिन्यांनंतर जेलमधून आलेली दिशा आता किर्लोस्कर कुटुंबाचा सर्वनाश करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तिने स्वतःची नवी कंपनी सुरू केली आहे. त्यामुळेच सध्या दिशा म्हणजे पूर्वा शिंदे चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच अभिनेत्री पूर्वा शिंदेने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने मालिकेतील कलाकारांबरोबर असलेल्या बॉन्डबद्दल सांगितलं. तसंच पूर्वा मालिकेतील एका अभिनेत्रीला चिडका बिब्बा म्हणाली.

पूर्वा शिंदे म्हणाली, “माझं सगळ्यांशी खूप छान बॉन्ड आहे. सध्या माझ्या जवळची व्यक्ती आहे चिंटू म्हणजे संजना काळे. आम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी गेलो, तर तिथे आम्ही एकाच रुममध्ये राहतो. ती मला भरवते सुद्धा. म्हणजे तिला माहितीये, घरी माझे आई-बाबा त्यांच्या हाताने जेवण भरवतात. हे तिच्या नेहमी लक्षात असतं. त्यामुळे मी आवरत असेल, टाइमपास करत असेल तर ती मला पटापट घास भरवणार. इतकी माझी काळजी घेते. तिच्यासारखीच पारू आहे. रोज पॅकअप झाल्यावर कितीही तिला उशीर होऊ दे, ती दारातून हाक मारते पूर्वा, पूर्वा. फक्त हाय करण्यासाठी ती हे करते.”

पुढे पूर्वा म्हणाली की, मला कधी वाईट वाटलं, मी कफ्यूज असेल किंवा आयुष्याबद्दल काही धडे द्यायचे असतील तर मुग्धा ताईकडून ते नेहमी मिळतं. मी मगाशी एका मुलाखतीमध्ये चिडका बिब्बा म्हटल्यावर मुग्धा ताईचं नाव घेतलं होतं. कारण ती माझ्यावर बऱ्याचदा चिडते. कारण मी पण तशी वागते. मात्र ती सर्वात चांगल्या मनाची आहे. आमच्यात खूप चर्चा होतात. ती मला खूप छान मार्गदर्शन करते. तसंच श्रुतकिर्ती सावंत माझी सखी आहे. मला वाटतं अशी सहकलाकार प्रतीक्षा मुंगेकरनंतर ती आहे. मी खूप एन्जॉय केलंय, दामिनी आणि दिशावालं बॉन्ड. आम्ही अजूनही मजा करत सीन करतो. एकेकाळी अशी वेळ होती, आम्ही एकमेकींकडे बघत नव्हतो, बोलत नव्हतो. आमचं भांडण झालं होतं. पण, कॅमेरा समोर आल्यावर सगळं विसरून जायचो. मी खूप भांडकोर आहे. त्यामुळे माझी सगळ्यांशी थोडी-थोडी भांडण होतात. पण नंतर चांगले होतो.

दरम्यान, पूर्वा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘पारू’ मालिकेआधी ‘लागिरं झालं जी’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘जीव माझा गुंतला’, ‘टोटल हुबलाक’ यांसारख्या मालिकेत झळकली होती. तसंच तिने ‘युवा डान्सिंग क्वीन’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या दोन लोकप्रिय कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.