मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने २१ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. चिपळूणमध्ये दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, लग्नानंतर मुग्धा सासरी खूप आनंदी दिसत आहे. प्रथमेशच्या घरी आरवली येथे मुग्धा लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहे. नुकताच मुग्धाने तिच्या सासरी लग्नानंतरचा पहिला उत्सव म्हणून दत्तजयंती साजरी केली. मुग्धाने याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत तिने लिहिले, “आमच्या लग्नानंतरचा पहिला उत्सव! तोही लाडक्या देवाचा. श्री दत्तजयंती. आरवलीतला घरचा दत्तजयंती उत्सव, एकत्र भजन सेवा. अजून काय हवं!?”

व्हिडीओवरून प्रथमेशच्या घरी दत्तजयंतीच्या उत्सव दणक्यात साजरा केला जातो, असे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये मुग्धा दत्तजयंतीची तयारी करताना दिसत आहे. एवढेच नाही, तर दत्तजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भजन कार्यक्रमात मुग्धा व प्रथमेश यांनी भजनही गायले आहे. मुग्धाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा- केक, गुलाबाचा गुच्छ अन्…; लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त श्रेया बुगडेला नवऱ्याने दिले खास सरप्राईज, पाहा फोटो

‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मधून मुग्धा व प्रथमेश घराघरांत पोहोचले. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. आता नुकतीच दोघांनी लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.