‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन आजकाल नेहमी चर्चेत असते. तिच्या सुमधूर आवाजाची जितकी चर्चा असते, तितकीच तिची सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. अनेकदा मुग्धाला ट्रोल केलं जातं, पण या ट्रोलर्सना ती आणि तिचा पती प्रथमेश लघाटे सडेतोड उत्तर देत असतात. यंदा मुग्धा व प्रथमेशचा लग्नानंतर पहिला गुढीपाडवा आहे. त्यानिमित्ताने मुग्धाने सोशल मीडियावर खास पोस्ट करत आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुग्धा वैशंपायनने पारंपरिक लूकमधला प्रथमेशसहचा फोटो शेअर करून चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप शुभेच्छा”, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. फोटोमध्ये मुग्धा हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे; ज्यावर तिने लाल रंगाची शाल घेतली आहे. तसेच कपाळावर कंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या अशा पारंपरिक रुपात ती पाहायला मिळत आहेत. तसेच प्रथमेश गुलाबी रंगाच्या सोहळ्यात दिसत आहेत.

हेही वाचा – Video: रितेश देशमुखने मुलांसह उभारली गुढी, जिनिलीया व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “पहाटे आमची…”

मुग्धाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी मुग्धा व प्रथमेशला पहिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हाला पहिल्या पाडव्याच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद”, “किती गोड दिसताय”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. शिवाय एका नेटकऱ्याने विचारलं, “लग्नानंतरचा पहिला पाडवा. प्रथमेशकडून काय गिफ्ट मिळालं मुग्धा?”

हेही वाचा – Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ची वाट पाहताय, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो

दरम्यान, मुग्धा व प्रथमेशचा प्रेमविवाह आहे. गेल्या वर्षी २१ डिसेंबरला दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्न झालं. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Story img Loader