मराठी संगीत विश्वातील लाडकी व लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले मुग्धा व प्रथमेश आयुष्यभराचे जीवनसाथी झाले आहेत. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले. दोघांचं मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीने लग्न झालं. २१ मार्चला दोघांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले. हा दिवस दोघांनी कसा साजरा केला? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुग्धा व प्रथमेश लग्न झाल्यापासून नेहमी चर्चेत असतात. दोघंही दैनंदिन जीवनातला अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अनेकदा दोघांना ट्रोल केलं आहे. पण प्रथमेशने सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सचं तोंडही बंद केल्याच पाहायला मिळालं. नुकतीच मुग्धाने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधून तिने लग्नाला ३ महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने काय केलं? याविषयी सांगितलं.

हेही वाचा – Video: “मला तिकिट मिळालं आहे”, बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रीचा निवडणुकीआधी मोठा दावा; राजकारणात करणार एन्ट्री? म्हणाली…

मुग्धाने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पती प्रथमेशबरोबर पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये मुग्धा निळ्या रंगाच्या साडीत, तर प्रथमेश फिकट हिरव्या रंगाच्या शॉर्ट कुर्तामध्ये दिसत आहे. तसेच मुग्धाने मंदिराचे देखील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले. याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. हेची घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे|”

मुग्धा-प्रथमेशचा या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “दोघंही गोड दिसताय”, “सुंदर. असेच आनंदी राहा. देवाचे तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहो”, “किती गोड”, “नांदा सौख्य भरे”, अशा प्रतिक्रिया दोघांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: गरीब मुलांना बॉबी देओलने दिले ५०० रुपये; मुलांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून अभिनेता लागला हसू

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं. प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं.