मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा विवाहसोहळा २१ डिसेंबर २०२३ रोजी पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला २१ फेब्रुवारीला दोन महिने पूर्ण झाले. यानिमित्ताने प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने इन्स्टाग्रामवर खास रोमँटिक व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुग्धा-प्रथमेशची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. शो संपल्यावर काही वर्षांनी मुग्धा-प्रथमेश एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करू लागले. यादरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि गेल्यावर्षी ‘आमचं ठरलंय’ असं सांगत मुग्धा-प्रथमेशने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

हेही वाचा : लगीनघाई! प्रथमेश परबला लागली क्षितिजाच्या नावाची हळद, फोटो आले समोर

डिसेंबर २०२३ मध्ये या दोघांचा विवाहसोहळा चिपळूण येथे थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील व संगीत क्षेत्राशी निगडीत अनेक लोक उपस्थित राहिले होते. आता लग्नसोहळ्याला दोन महिने पूर्ण झाल्यावर या जोडप्याने एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये मुग्धा सुंदर अशी साडी नेसल्याचं व प्रथमेशने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : मिस्टर अँड मिसेस भगनानी! लग्नानंतर पहिल्यांदाच रकुल प्रीत व जॅकी आले माध्यमांसमोर, व्हिडीओ व्हायरल

समुद्रकिनारी आपली संस्कृती जपत पारंपरिक लूकमध्ये शूटिंग केल्यामुळे सध्या मुग्धा-प्रथमेशवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “खूपच छान..मला सगळ्यात जास्त आवडलं ते बीचवर पण पारंपारिक पेहराव घालून शूटिंग केलं”, “एकदम सुंदर…”, “तुम्हा दोघांना कोणाची नजर न लागो” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

दरम्यान, मुग्धा-प्रथमेशचा साधेपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून सध्या या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.