‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली. दोघांनी फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांना त्यांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती दिली, तेव्हापासून सातत्याने दोघांची चर्चा सुरू आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. ते त्यांच्या नात्याबद्दल व लग्नाच्या प्लॅनिंग्सबद्दल चाहत्यांना त्यांच्या युट्यूब व्हिडीओंच्या माध्यमातून माहिती देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कुठल्याही हिंदीतल्या पार्ट्यांना गेलं की…”, ‘लस्ट स्टोरीज २’नंतर अमृता सुभाषची कोंकणा सेन शर्मासाठी पोस्ट

मुग्धा व प्रथमेश एकमेकांना ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून ओळखतात. पण मागच्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मुग्धा म्हणाली, “आम्ही ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून एकमेकांना ओळखतो. हा शो संपल्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र अनेक शो केले. आम्ही आधी चांगले मित्र होतो आणि आम्हा दोघांना एकमेकांची सवय झाली होती. आधी आमची म्युझिकल ट्युनिंग झाली आणि नंतर आमचे विचार जुळले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून अधिकृतपणे एकमेकांना डेट करत आहोत. प्रथमेशने मला आधी प्रपोज केले. आमच्या नात्यात घाईत काहीही घडलं नाही, सर्व काही टप्प्याटप्प्याने घडलं.”

प्रथमेश व मुग्धाने त्यांचे नाते अधिकृत केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल न झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “आम्ही आमच्या नात्याची कबुली दिली, तेव्हा आम्हाला एकही नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नाही, त्यासाठी आम्ही आभारी आहोत,” असं ते म्हणाले. तसेच दोघेही लवकरच लग्नाबद्दलचे इतर तपशील चाहत्यांशी शेअर करणार आहेत.