आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका मुग्धा वैशंपायन नेहमी चर्चेत असते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुग्धाने गायक प्रथमेश लघाटे याच्याशी लग्न केलं. तेव्हापासून मुग्धा व प्रथमेश व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. लग्नानंतर दोघं जोरदार कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. काल, मुग्धा व प्रथमेशचा लग्नानंतरचा पहिला डोंबिवलीतला ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन हाऊसफुल केला. मुग्धाने हा अनुभव चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुग्धा वैशंपायने काही फोटो शेअर करत कार्यक्रम हाऊसफुल झाल्याचा अनुभव सांगितला आहे. फोटोंमध्ये मुग्धा व प्रथमेश हाऊसफुलची पाटी घेऊन आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये दोघांच्या कार्यक्रमाला अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी हजेरी लावण्याचं दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – शाहिद कपूरचा संघर्ष: चॉकलेट बॉयची इमेज ते राऊडी हिरो…

हाऊसफुल कार्यक्रमाचे खास क्षण शेअर करत मुग्धाने लिहिलं, “आणखी एक हाऊसफुल्ल! काल मी आणि प्रथमेशने आमच्या लाडक्या म्युझिशियन्स दादांबरोबर डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम सादर केला आणि नेहमीप्रमाणेच डोंबिवलीकर मायबाप रसिकांनी कालच्या कार्यक्रमाला हाऊसफुल प्रतिसाद दिला. हाऊसफुलच्या बोर्डाबरोबर फोटो काढण्याचं समाधान प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठं असतं जसं ते आमच्याही चेहऱ्यावर झळकतंय. खूप खूप खूप मनापासून धन्यवाद, रसिकहो…लगेचच दुसरीकडे जाण्याची घाई असल्यामुळे रसिकांबरोबर फोटो काढायचे राहिले. पुढच्यावेळी नक्की काढू…”

हेही वाचा – Video: रिसेप्शनमध्ये ‘मला वेड लागले प्रेमाचे’ म्हणत प्रथमेश परबची बायकोसह एन्ट्री, शाहरुख खानच्या गाण्यांवर केला जबरदस्त डान्स

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी कशी सुरू झाली?

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा व प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं. प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करून लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं.

Story img Loader