प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आले. आता संगीत क्षेत्रात दोघांनीही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सारेगमप’ या कार्यक्रमापासून सुरु झालेली त्यांची मैत्री आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश-मुग्धाने ‘आमचं ठरलंय’ म्हणत सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. लवकरच ते दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या प्रथमेश-मुग्धाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेला लग्नासंदर्भातला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : ठरलं तर मग : प्रेमाच्या दिशेने अर्जुनचं पहिलं पाऊल, तर सायलीच्या मनात परकेपणाची भावना; मालिकेत येणार नवं वळण
मुग्धा-प्रथमेश काही दिवसांपूर्वी वैचारिक किडाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात “लग्नाचं योग्य वय कोणतं?” याविषयावर दोघंही आपलं मत मांडत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रथमेश मुग्धाला विचारतो, “आताचा एक ट्रेंड असा आहे की, मागच्या काही वर्षांमध्ये अठ्ठावीस-तिशीपर्यंत लग्नाचा विचार केला जात नाही किंवा आरामात लग्न करूया अशी भावना असते याबद्दल तुला काय वाटतं?”
हेही वाचा : ‘खतरों के खिलाडी’, ‘बिग बॉस’नंतर आता शिव ठाकरे गाजवणार ‘झलक दिखला जा’! ‘हे’ १० सेलिब्रिटी होणार सहभागी
प्रथमेशने लग्नाच्या वयासंदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना मुग्धा म्हणते, “मला वाटतं आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय ठरवलं आहे. अर्थात पूर्वीच्या काळात लग्न करताना मुलाच्या आणि मुलीच्या वयात जे अंतर असायचं ते १०० टक्के चुकीचं आहे. पण, अमुक-अमुक वयात मुलाचं-मुलीचं लग्न झालं पाहिजे यामागे काहीतरी लॉजिक आहे. विशिष्ट वयात लग्न का झालं पाहिजे? यामागची कारण तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहिती आहेत. फक्त आपली जनरेशन ती कारणं स्वीकारत नाही. कारण, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, उशिरा लग्न करायचं असतं, स्वत:ची स्पेस सोडायची नसते वगैरे वगैरे…यासाठी फक्त वयाला दोष दिला जातो. मला या गोष्टी नाही पटत…योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं.”
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, “माणुसकी शिल्लक आहे”
मुग्धा-प्रथमेशचा “लग्नाचं योग्य वय कोणतं?” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. काही वेळातच या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्यावर मुग्धा आणि प्रथमेशने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. दोघांचीही पहिली भेट लिटिल चॅम्प्सच्या मंचावर झाली होची. या शोनंतर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.