Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर नोव्हेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. मुग्धा-प्रथमेशच्या व्याहीभोजनाचे फोटो पाहून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर दोघांच्या घरी लग्नविधीला सुरुवात झालेली आहे.
मुग्धाने हळदी समारंभाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला “हरिद्रा लापन । घाणा भरणे” असं कॅप्शन दिलं आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं या फोटोंवरून पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : उपेंद्र लिमयेंच्या लेकाने रणबीर कपूरसाठी दिलेला खास निरोप; म्हणाले, “अॅनिमलच्या सेटवर…”
मुग्धाने या फोटोंना “मोदक गॉट मॉनिटर….” असे हॅशटॅग दिले आहेत. कारण, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर प्रथमेशला ‘मोदक’, तर मुग्धाला ‘मॉनिटर’ म्हटलं जायचं. गायिकेने शेअर केलेल्या हळदी समारंभाच्या फोटोंमध्ये संपूर्ण वैशंपायन कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Video: ‘रात्रीस खेळ चाले’मधल्या माईची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत
दरम्यान, मुग्धा-प्रथमेशच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं झालं, तर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमापासून सुरु झालेली त्यांची मैत्री आजही कायम आहे. या शोनंतर त्यांचे गाण्याचे अनेक कार्यक्रम व्हायचे. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.