‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेली गायिका मुग्धा वैशंपायन नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या सुमधूर आवाजाने तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. गायक प्रथमेश लघाटेबरोबर लग्न झाल्यापासून मुग्धा नेहमी त्याच्याबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिनं लग्नानंतरचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला? याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५ एप्रिलला मुग्धाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस झाला असून तिनं २४व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मुग्धाच्या वाढदिवशी प्रथमेश, तिची बहिणी अशा सगळ्यांनी तिच्यासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. गायिकेच्या वाढदिवसाला महिना उलटून गेला आहे. पण काल मुग्धाने तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला? प्रथमेशचं खास सरप्राइज काय होतं? हे मिनी व्लॉगमधून शेअर केलं.

हेही वाचा – ‘पुढचं पाऊल’ फेम अभिनेत्याची ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत जबरदस्त एन्ट्री, झळकला ‘या’ महत्त्वाच्या भूमिका

“आमच्या लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस अशा प्रकारे साजरा करण्यात आला. या मिनी व्लॉगमध्ये शेअर करत आहे. संपूर्ण व्हिडीओ माझ्या युट्यूब चॅनेलवर नक्की पाहा. धन्यवाद प्रथमेश दांडेलच्या छोट्याशा सरप्राइज ट्रीपसाठी”, असं लिहित मुग्धाने व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत, मुग्धा आणि प्रथमेश बोटिंग, स्काय सायकलिंग, जंगल सफारी करताना दिसत आहेत. अशाप्रकारे कर्नाटकातील दांडेलमध्ये मुग्धाने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस प्रथमेशबरोबर साजरा केला होता. दोघांचा हा सुंदर व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे-लीलाचा ‘नाच गं घुमा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, सोबतीला होते निर्माते; पाहा व्हिडीओ

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं.

प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं. घरच्यांना सांगितल्यानंतर दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mugdha vaishampayan celebrated her first birthday after marriage with prathesh laghate video viral pps