मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून हे दोघे घराघरांत लोकप्रिय झाले होते. पुढे, शो संपल्यावर काही वर्षांनी या दोघांनी एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन मुग्धा-प्रथमेशने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश नेहमीच आपली महाराष्ट्रीय संस्कृती, परंपरा, मराठमोळे सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुग्धाने पहिला गुढीपाडवा साजरा केला होता. आता रामनवमीनिमित्त अभिनेत्रीने खास महानैवेद्य बनवला होता. प्रथमेशने मुग्धाने बनवलेल्या रुचकर पदार्थांच्या थाळीचा फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींना ‘इतक्या’ लाखांची दिलेली सुपारी; पोलिसांची माहिती, आणखी एकाला अटक

वरणभात तूप तुळशीपत्र, आंब्याच्या फोडी, बटाटा भाजी, पोळी कुरडई, गाजर टोमॅटो कोशिंबीर, आमरस असं साग्रसंगीत जेवण मुग्धाने रामनवमीनिमित्त बनवलं होतं. प्रथमेश या ताटाचा फोटो शेअर करत लिहितो, “माझ्या प्रिय पत्नीने रामनवमीनिमित्त खास महानैवेद्य केला आहे.” याशिवाय रामनवमीनिमित्त मुग्धाने स्वत: संगीतबद्ध केलेलं एक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

प्रथमेश लघाटे इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, मुग्धा-प्रथमेश सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. या जोडप्याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mugdha vaishampayan cook special food on the occasion on ram navami prathamesh shares photo sva 00