‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली लाडकी गायिका मुग्धा वैशंपायन नेहमी चर्चेत असते. लग्न झाल्यापासून मुग्धा पती प्रथमेश लघाटेबरोबरचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. तसंच इन्स्टाग्राम स्टोरीवरून दैनंदिन जीवनातले अनुभव चाहत्यांना सांगत असते.

अलीकडेच मुग्धाने लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने एक पोस्ट केली होती. या पोस्टसह तिने काही फोटो देखील शेअर केले होते. या फोटोमध्ये मुग्धा निळ्या रंगाच्या कॉर्टनच्या साडीत दिसली होती. कंपाळावर कंकू, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा अशा पारंपरिक लूकमध्ये मुग्धा पाहायला मिळाली. पण याच लूकवरून काही युजरने तिला ‘काकू’ म्हटलं. या युजरना मुग्धा व प्रथमेशने चोख उत्तर दिलं. यामुळे दोघं चांगलेच चर्चेत आले होते. नुकतंच मुग्धाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पहिल्यांदाच काजूच्या बागेत घेतलेला अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा – “स्वातंत्र्य वीर सावरकर या देशाला अजून १०० वर्ष हवे होते”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, रणदीप हुड्डाचे आभार मानत म्हणाली…

मुग्धाने काजूच्या बागेत बसलेला फोटो शेअर करून लिहिलं, “प्रथमेशच्या आजोळी चाफेड गेलो होतो. मी पहिल्यांदाच काजूची बाग बघितली. काजू पहिल्यादांच गोळा केले, निवडले. जाम मजा आली. आपला कोकण भारी आसा.” मुग्धाची ही पोस्ट सोशल चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मराठी कलाकारांची वर्णी, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यासह झळकणार ‘ही’ अभिनेत्री

दरम्यान, गेल्यावर्षी २१ डिसेंबरला मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अडकले. दोघांचं मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीने लग्न झालं होतं. लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Story img Loader