Mugdha Vaishampayan Ukadiche Modak : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांची जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमध्ये दोघांनी एकत्र सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम संपल्यावर पुढे काही वर्षांनी गाण्यांच्या कार्यक्रमानिमित्त दोघांची एकमेकांशी भेट व्हायची. कालांतराने मुग्धा-प्रथमेशमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोप्याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.

मुग्धा ( Mugdha Vaishampayan ) आणि प्रथमेशने यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव कोकणात साजरा केला. मुग्धाची सासुरवाडी कोकणात आरवली येथे आहे. गायिकेने सासरच्या गणपती बाप्पाची झलक काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या फोटोंमध्ये प्रथमेश-मुग्धा जोडीने बाप्पाचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता मुग्धाने गणेशोत्सवादरम्यानचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मुग्धा उकडीचे मोदक बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा : “आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बाबा…”

मुग्धाने बनवले उकडीचे मोदक, पाहा व्हिडीओ

कोकणात गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे घराघरांत मोठ्या हौशेने उकडीचे मोदक बनवले जातात. मुग्धाचा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव असल्याने तिने देखील सासरी उकडीचे मोदक बनवल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मुग्धा अगदी मराठमोळा साज करून उकडीचे मोदक बनवत आहे. त्यामुळे गायिकेचा साधेपणा नेटकऱ्यांना पुन्हा एकदा भावला आहे. मुग्धाच्या ( Mugdha Vaishampayan ) व्हिडीओवर नेटकऱ्यांसह प्रसिद्ध कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात प्रथमेश लघाटेला सगळे ‘मोदक’ म्हणायचे. त्यामुळे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतने या व्हिडीओवर “बनव गं बनव… माझ्या मोदकासाठी मोदक बनव” अशी कमेंट केली आहे. तर, अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या व्हिडीओवर कमेंट करत “मस्त मस्त” म्हटलं आहे.

हेही वाचा : Video : “ट्रॉफी मिळो न मिळो, मला हिचा गर्व…”, जान्हवीने केला निर्धार, निक्कीबद्दल म्हणाली…

Mugdha Vaishampayan
मुग्धाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Mugdha Vaishampayan )

दरम्यान, याशिवाय नेटकऱ्यांनी मुग्धाच्या ( Mugdha Vaishampayan ) व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वाह वाह सर्व गुणसंपन्न सून आहे हो लघाट्यांची खूप छान मुग्धा”, “मस्त गो मुग्धा”, “उकडीचा मोदक तर प्रथमेश लघाटे आहे”, “भारी…”, “वैशाली ताईने प्रथमेशला उकडीचा मोदक म्हटलं आहे”, “तुझा पारंपरिक लूक”, “थोडक्यात एवढ्या कष्टाचे चीज तेव्हाच होईल जेव्हा…. मोदकाला हा ‘मोदक’ आवडेल” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader