‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन डिसेंबर २०२३मध्ये लग्नबंधनात अडकली. प्रथमेश लघाटे याच्याबरोबर तिनं लग्न केलं. तेव्हापासून मुग्धा व प्रथमेश वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चा असते. लग्नानंतर ते कुठे जातायत?, काय करतायत? याची चर्चा सुरू असते. अशातचं मुग्धाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुग्धा वैशंपायन सध्या अंदमान दौऱ्यावर आहे. ती या दौऱ्यात एकटीच असल्यामुळे तिला पती प्रथमेशची आठवण येत आहे. त्यानिमित्ताने मुग्धाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 मधून बाहेर पडल्यावर विक्की जैनचं पत्नी अंकिता लोखंडेबद्दल भाष्य; म्हणाला, “तिची खूप…”

इन्स्टाग्रामवर मुग्धाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एकटी समुद्र किनारी बसलेली दिसत आहे. या व्हिडीओवर मुग्धाने लिहिलं आहे, “प्रथमेश मला तुझी खूप आठवण येतेय. मला माहितीये, हे मिसिंग प्रकरण जरा जास्त होतंय असं वाटले तुम्हा सगळ्यांना. पण काय करणार.”

हेही वाचा – साई पल्लवीच्या बहिणीचा झाला साखरपुडा, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “माझी…”

मुग्धा व प्रथमेशची लव्हस्टोरी

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा आणि प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं. प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करून लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं. मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. २१ डिसेंबर २०२३ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले.