Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे घराघरांत लोकप्रिय झाले. हा शो संपल्यावर पुढे अनेक वर्षांनी मुग्धा-प्रथमेश एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करू लागले. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोडप्याने डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली.

मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघांचाही साधेपणा कायम प्रेक्षकांना भावतो. याशिवाय दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातील विविध गोष्टी हे दोघेही चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश सगळे सणवार आनंदाने साजरे करतात. याशिवाय नेहमीच आपल्या मराठी परंपरा जपतात. यामुळे या जोडप्याचं सोशल मीडियावर देखील कौतुक केलं जातं. सध्या गायिकेने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “आला रे आला…भाऊचा धक्का”, यंदाच्या सीझनचं जबरदस्त गाणं ऐकलंत का? रितेश देशमुखने वेधलं लक्ष

मुग्धा वैशंपायनने शेअर केला सुंदर व्हिडीओ

मुग्धाची सासुरवाडी आरवलीत आहे. प्रथमेशच्या घरातील सगळे कुटुंबीय एकत्र बसून भजन सेवा करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. गायिका यामध्ये म्हणते, “मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला… नित्य गुरुवार भजन सेवा.. अजून काय हवं?” गायिकेच्या सासरी दर गुरुवारी अशाप्रकारे भजन सेवा दिली जाते हे तिच्या कॅप्शनवरून स्पष्ट होत आहे. मुग्धा व प्रथमेश दोघेही या व्हिडीओमध्ये भजन गात असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळीच्या वादावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्टच मत, कोणाची बाजू घेतली? जाणून घ्या…

हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, “दोन्ही वेळेची भांडी…”

mugdha
मुग्धा वैशंपायन ( Mugdha Vaishampayan ) व प्रथमेश लघाटे

मुग्धा – प्रथमेशच्या घरातील हे भक्तीमय वातावरण पाहून नेटकऱ्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “श्री गुरुदेव दत्त”, “खूप छान”, “तुम्ही आहात माझ्यासारख्या तरुणांचे खरे आदर्श… राम कृष्ण हरी”, “खरचं आमचं भाग्य आहे तुमचा आवाज अणि प्रभूचे दर्शन”, “श्रीपाद वल्लभ दिगंबरा” अशा प्रतिक्रिया मुग्धाने ( Mugdha Vaishampayan ) शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader