मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही मराठी संगीतविश्वातील सगळ्यांची लाडकी जोडी. दोघं खूप चर्चेत असतात. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वापासून मुग्धा-प्रथमेश आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहेत. दोघांचे महाराष्ट्रासह जगभरात कार्यक्रम होताना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमांना श्रोत्यांची हाउसफुल्ल गर्दी होताना दिसत आहेत. अशा या लोकप्रिय मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या पहिल्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला. हा खास दिवस दोघांनी कसा साजरा केला, हे मात्र आता समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी २१ डिसेंबर २०२३ला मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकले. मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता. दोघांच्या लग्नातले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यंदाच्या २१ डिसेंबरला मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला वर्ष पूर्ण झालं. हा खास दिवस दोघांनी एकमेकांबरोबर साजरा आहे.

हेही वाचा – Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

“अशाप्रकारे आम्ही आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला”, असं कॅप्शन लिहित मुग्धाने काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघांनी लग्नाचा पहिला वाढदिवस सुंदररित्या साजरा केलेला पाहायला मिळत आहे. लंच डेटपासून ते डिनर डेटपर्यंतचे फोटो मुग्धाने शेअर केले आहेत. त्यामुळे मुग्धाच्या या पोस्टवर चाहते लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: “कानाखाली देईन, तू हृतिक रोशन नाहीये”, कशिश कपूर अविनाश मिश्रावर भडकली, नेमकं काय घडलं? वाचा…

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं. प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं. मग मुग्ध व प्रथमेशने २१ डिसेंबरला लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

हेही वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून दोघं एकत्र कार्यक्रम करताना दिसत आहेत. दोघांच्या कार्यक्रमांना श्रोत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. लवकरच श्रीमत सच्चिदानंद सदगुरु स्वामी स्वरुपानंद यांच्या १२२व्या जयंतीनिमित्ताने ‘संजीवन स्वरुप’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संजीवनी गाथा या स्वामीजींनी रचलेल्या २६१ अभंगांतील काही निवडक रचना मुग्धा-प्रथमेश सादर करणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mugdha vaishampayan prathamesh laghate first anniversary celebration photos pps