मराठी संगीतविश्वातील सर्वांची लाडकी जोडी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे नेहमी चर्चेत असतात. दोघांनी आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे मुग्धा आणि प्रथमेशच्या विविध कार्यक्रमाला श्रोत्यांची गर्दी पाहायला मिळते. नुकतीच दोघांनी लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं. दोघांचं मोठ्या थाटामाटात, रिती-रिवाजानुसार लग्नसोहळा पार पडला होता. मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. गेल्यावर्षी दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. सध्या मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाला दुसरं वर्ष सुरू आहे. या दुसऱ्या वर्षात दोघांनी पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
मुग्धा वैशंपायने पहिल्या मकरसंक्रांतीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पारंपरिक पद्धतीने दोघांनी पहिली मकरसंक्रांत साजरी केल्याचं पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने दोघांनी परिधान केल्याचं दिसत आहे. मुग्धा आणि प्रथमेश या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
हेही वाचा – Bigg Boss 18: “ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली…
मकरसंक्रांतीनिमित्ताने मुग्धा आणि प्रथमेशने केलेल्या लूकचं काही कलाकार मंडळींसह चाहत्यांनी कौतुक केलं आहे. “मुग्धा खूप गोड दिसतेस”, “दोघं खूप छान दिसताय”, “तुमची जोडी खूप छान आहे, दोघं खूप गोड दिसताय…असाच गोडवा तुमच्या आयुष्यात सदैव राहो आणि एक…खालचं सारवलेलं आंगण खूप छान दिसतंय”, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला गर्लफ्रेंड नाहीतर…”, चुम दरांगने करणवीर मेहराची उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ
दरम्यान, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून दोघं एकत्र कार्यक्रम करताना दिसत आहेत. दोघांच्या कार्यक्रमांना श्रोत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला मुग्धाची ‘अयोध्या बोलावतेय’ ही यात्रा सुरू आहे. या यात्रेत गीत रामायण गायन, वाल्मिकी रामायण व्याख्यान अशी मैफल रंगते. याचे व्हिडीओ मुग्धा नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.