मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा विवाहसोहळा चिपळूण येथे २१ डिसेंबर २०२३ रोजी थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार व जवळच्या मित्रमंडळींनी उपस्थिती लावली होती. सध्या मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच गायिकेच्या मेहंदी सोहळ्यातील एक खास फोटो समोर आला आहे.
मृग्धा वैशंपायनची मोठी बहीण मृदुलने मेहंदी सोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोन बहिणींच्या गोड नात्याची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय मुग्धाच्या हातावरील आकर्षक मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : “अन् मातोश्रीशी संबंध संपला…”, नाना पाटेकरांनी सांगितली जुनी आठवण; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाले…
मुग्धाच्या हातावरच्या मेहंदीवर काही खास संदेश लिहिण्यात आले आहेत. तिच्या एका हातावर ‘#MGotModak’ असा हॅशटॅग लिहिण्यात आला आहे. यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे मुग्धाला सारेगमपमध्ये ‘मॉनिटर’, तर प्रथमेशला ‘मोदक’ म्हटलं जायचं. याचप्रमाणे अभिनेत्रीच्या दुसऱ्या हातावर “आमचं ठरलंय…” असं लिहिण्यात आलं आहे. या दोघांनी सोशल मीडियावर पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिलेल्या फोटोला आमचं ठरलंय असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे लग्नात सुद्धा हे दोन्ही हॅशटॅग गायिकेच्या हातावरच्या मेहंदीत पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : “आमचं झालंय!”, लग्नगाठ बांधल्यानंतर मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची पहिली पोस्ट, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
दरम्यान, मुग्धा-प्रथमेशने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर मराठी सिनेविश्वातील कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कुशल बद्रिके, स्पृहा जोशी, सुकन्या मोने, शरयू दाते या कलाकारांनी दोघांच्या फोटोंवर कमेंट करत त्यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले आहेत.