मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक म्हणून प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनला ओळखले जाते. गेल्यावर्षी डिसेंबर २०२३ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. चिपळूणमध्ये दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
मुग्धा व प्रथमेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान, आता प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. संकष्टीनिमित्त मुग्धाने प्रथमेशसाठी खास पदार्थ बनवलेला होता. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “संकष्टीच्या उपवासानिमित्त माझ्या प्रिय बायकोने केलेली तयारी”, त्याने हा फोटो मुग्धाला टॅगही केला आहे. प्रथमेशची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.
लग्नानंतर मुग्धा व प्रथमेशने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुग्धा अंदमान दौऱ्यावर गेली होती. अंदमानला एकटीच गेली असल्यामुळे तिला प्रथमेशची आठवण येत होती. मुग्धाने तिथल्या समुद्रकिनाऱ्याचा एक व्हिडीओ शेअर करत “प्रथमेश मला तुझी खूप आठवण येतेय”, असेही लिहिले होते. तर प्रथमेशही गीतरामायणाच्या कार्यक्रमासाठी इंदौरला गेला होता. त्यावेळेस त्याने मुग्धाच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा- श्रेया बुगडेने दादरमध्येच का उघडले रेस्टॉरंट? अभिनेत्री कारण सांगत म्हणाली, “मुंबईत…”
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून मुग्धा व प्रथमेश घराघरांत पोहोचले. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघांच्या ग्रहमखपासून हळदीपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अत्यंत साध्या आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नापूर्वीचे विधी पार पडले. लग्नातही दोघांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. दोघांच्या साध्या लूकचे सगळीकडे कौतुक झाले होते.