‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. तर आता त्यांच्या केळवणांना सुरुवात झाली आहे. मुग्धाच्या आजोळी नुकतंच तिचं केळवण थाटामाटात पार पडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याबद्दल सर्वांना सांगताच आता ते लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या केळवणांना ही सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या पहिल्या केळवणाची झलक दाखवली. तर आता मुग्धाच्याही आजोळी तिचं केळवण पार पडलं.

आणखी वाचा : ‘अशी’ सुरु झाली मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी, म्हणाले, “घरी सांगितलं तेव्हा…”

मुग्धाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर तिच्या आजोळी पार पडलेल्या केळवणाचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये तिच्यासमोर पंचपक्वांचं ताट दिसत आहे. तर त्याभोवती मोत्यांची महिरपही मांडली आहे. तिच्या केळवण्यासाठी पारंपारिक पदार्थ बनवण्यात आले होते. पुरणपोळी, करंजी, श्रीखंड, शिरा आणि जिलेबी हे गोड पदार्थ, तर सुरळीच्या वड्या, अळूची भाजी, बटाट्याची भाजी, वरण-भात हा मेन्यू होता. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “आजोळचं केळवण.”

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश यांनी एका मुलाखतीमध्ये ते या सहा महिन्यांत लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. तर त्यांना त्यांचा लग्नही पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने करायचं आहे. त्यामुळे आता ते त्यांच्या लग्नाची तारीख कधी जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mugdha vaishampayan shared photos of her kelvan post gets viral rnv