लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायनने नुकतीच भारतीय शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून गायिका घराघरांत लोकप्रिय झाली. गाण्याचे कार्यक्रम सांभाळून तिने शैक्षणिक आयुष्यात उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे सध्या मुग्धावर मराठी कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तिचा पती प्रथमेश लघाटे, बहीण मृदुल यांनी देखील गायिकेसाठी खास पोस्ट शेअर केली होती. आता स्वत: मुग्धाने दीक्षान्त समारंभातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गायिका मुग्धा वैशंपायनने मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातून शैक्षणिक वर्ष २०२१-२३ अंतर्गत संगीत अधिस्नातक (एम.एफ.ए) (गायन) हा दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. यात सर्वाधिक गुण प्राप्त करीत दिवंगत ‘श्री रंजनकुमार एच. वैद्य’ या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. मुग्धाची अंतिम परीक्षा एप्रिल – २०२३ मध्ये पार पडली होती.

हेही वाचा : वर्ष होण्याआधीच मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न? पतीचं विदेशातील घर सोडून भारतात परतली, तिची टीम म्हणाली…

मुग्धा याविषयी सांगताना लिहिते, “महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मला ‘मास्टर्स इन हिंदुस्तानी क्लासिकल व्होकल’ या विषयात विद्यापीठाचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मी माझ्या गुरु विदुषी शुभदा ताई पराडकर, डॉ. अनया थत्ते आणि मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील सर्व शिक्षकांचे आभार मानते!! याशिवाय सदैव माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे माझे प्रिय आई-बाबा, ताई आणि प्रथमेश तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझ्या दुसऱ्या घरचे म्हणजेच सासरचे सदस्य कल्याणी वहिनी, विघ्नेश दादा तुम्हालाही थँक्यू… मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”

हेही वाचा : ‘इरॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत! सात वर्षांनी उघडलं मुंबईतल्या सर्वात दिमाखदार सिनेमागृहाचं दार

दरम्यान, मुग्धाने पदव्युत्तर पदवी संपादन केल्यावर याआधी प्रथमेशने लाडक्या बायकोसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. “माझ्या प्रिय बायकोचं खूप खूप अभिनंदन! आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.” असं त्याने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं. सतत गाण्याचे कार्यक्रम, वैयक्तिक आयुष्यात लग्न, दौरे या सगळ्या गोष्टी सांभाळून गायिकेने एवढं मोठं यश मिळवल्याने सध्या मराठी कलाविश्वातून मुग्धावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mugdha vaishampayan wons gold medal in music shares special post after winning award sva 00