‘अलीबाबा’ या मालिकेच्या सेटवर सगळं काही सुरळीत सुरू असताना एक विचित्र घटना घडली. मालिकेमध्ये काम करणारी २० वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने मेकअपरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. बॉयफ्रेंड व अभिनेता शीझान खानशी तिचं ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणाबाबत त्यांचं मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : रुग्णालयामध्ये तुनिषा शर्माचा मृतदेह पाहून आईची झाली अशी अवस्था, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळले

मुकेश खन्ना यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते तुनिषा प्रकरणाबाबत भाष्य करत आहेत. तसेच त्यांनी इतर मुलींच्या पालकांनाही एक सल्ला दिला आहे. शिवाय त्यांनी तुनिषाच्या पालकांनाच प्रश्न विचारले आहेत.

ते म्हणाले, “सगळेच तुनिषासाठी अस्वस्थ आहेत. पण यामध्ये सगळ्यात मोठी चूक त्या मुलीच्या पालकांची आहे. मुलं स्वतःला सांभाळू शकतात. पण मुली खूप भावनिक असतात. काही मुली आपल्या बॉयफ्रेंडला देव मानतात. पण जेव्हा त्यांना कळतं की आपला जोडीदार आपली फसवणूक करत आहे तेव्हा विचार करा त्यांची काय अवस्था होते. तुनिषाचं मन दुखावलं आणि तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.”

आणखी वाचा – Video : आधी ढकलून दिलं, उकळतं पाणी अंगावर ओतलं अन्…; ‘बिग बॉस १६’मध्ये अर्चना गौतमने ओलांडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ व्हायरल

“पालकांनी मुलांना एकटं सोडू नये. अन्यथा प्रत्येक मुलीची अशीच अवस्था होऊ शकते. तुनिषाचे आई-वडील तिच्याबरोबर असते तर अशी घटना घडली नसती. पालकांनी प्रत्येक महिन्यात आपल्या मुलांना भेटणं गरजेचं आहे. पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण केलं पाहिजे.” त्याचबरोबरीने तुनिषा गेली पण तिच्या बॉयफ्रेंडवर आज प्रश्न निर्माण केले जात आहेत असंही मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh khanna angry reaction on tunisha sharma suicide case slams her parents see details kmd