छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेतील कलाकारांप्रमाणेच कोहली फॅमिलीही प्रेक्षकांची लाडकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक वाक्याचा ‘ली’ या अक्षराने शेवट करत कोहली फॅमिली धमाल स्किट सादर करतात. हास्यजत्रेतील कोहली फॅमिली म्हणजेच नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर आणि प्रसाद खांडेकर स्किट सादर करत प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पडतात. कोहली फॅमिलीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात. प्रेक्षकांच्या या लाडक्या कोहली फॅमिलीची भुरळ मुंबई इंडियन्सलाही पडली आहे.

हेही वाचा>> “मी पोलिसांत भरती झालो होतो, पण…” नागराज मंजुळेंचा खुलासा, म्हणाले “दहावीनंतर…”

मुंबई इंडियन्समधील ऑस्ट्रेलियन खेळाडू रायली मेरिडिथ याने हास्यजत्रेतील कोहली फॅमिलीवर मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये तो शेवटी “मी रायली अवली कोहली” असं म्हणताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रायली मेरिडिथचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नम्रता संभेरावने कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> “मी पोलिसांत भरती झालो होतो, पण…” नागराज मंजुळेंचा खुलासा, म्हणाले “दहावीनंतर…”

रायली मेरिडिथचा कोहलीच्या फॅमिलीचा व्हिडीओ पाहून नम्रताला हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओवर तिने हसण्याचे व हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. रायलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्याही हा व्हिडीओ पसंतीस उतरला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians australian player riley meredith made video on maharashtrachi hasyajatra kohli family namrata sambherao commented kak
Show comments