‘मुरांबा'(Muramba) या मालिकेतील अक्षय-रमा प्रेक्षकांचे लाडके असल्याचे पाहायला मिळते. मालिकेतील त्यांची पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. मात्र अक्षय रमाची ही जोडी आता दुरावल्याचे मालिकेत दिसत आहे. एका अपघातात रमा एका दरीत पडली. त्यानंतर तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. मात्र, ती सुखरूप असून एका गावात राहत आहे. या अपघातामुळे तिला काही आठवत नाही. मात्र, अक्षय हे नाव ती सतत घेत असते. दुसरीकडे अक्षयच्या समोर मात्र रमा आहे. ती रमाच्या रूपातील माही असल्याची अक्षयला कल्पना नाही. ज्या गाडीमुळे रमाचा अपघात झाला होता, ती गाडी माही चालवत होती. माही अगदी रमासारखीच दिसत असल्याने अक्षयच्या आईने माहीला रमा बनून मुकादमांच्या घरी राहण्यास सांगितले आहे. आता या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय माहीचे कौतुक करणार

स्टार प्रवाहने ‘मुरांबा’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अक्षय साईला फोन करत असतो. तिथे साई नसल्याने तो फोन रमा उचलते. दुसरीकडे माही रूममध्ये येते व अक्षयला विचारते की कशी दिसतेय मी? अक्षय तिच्याकडे बघून हसतो व रमा असे आनंदाने म्हणतो. तो तिला म्हणतो की एकदा आरशात बघ. माही व रमा दोघी आरशासमोर जातात. अक्षय माहीच्या रूपातील रमाला म्हणतो की तुला आरशात जी व्यक्ती दिसली आहे ती माझी जगातील सगळ्यात आवडती व्यक्ती आहे. हे रमा फोनवर ऐकत असते. तीला हे ऐकून आनंद होतो. तर माहीला चेहऱ्यावर संकोच दिसत आहे. एकीकडे अक्षय माहीला आय लव्ह यू असे म्हणतो तर दुसरीकडे साई रमाला गुलाबाचे फुल देत हॅपी व्हॅलेन्टाइन डे असे म्हणतो.

मुरांबा या मालिकेचा प्रोमो शेअर करताना, “नियतीच्या या खेळापुढे कसा निभाव लागणार रमा-अक्षयच्या नात्याचा…?”, अशी कॅप्शन दिली आहे. आता रमा-अक्षयची भेट कधी होणार, अक्षयला समोर असलेली व्यक्ती रमा नसून दुसरीच व्यक्ती असल्याची जाणीव होणार का, रमाला ती कोण आहे, अक्षय कोण आहे, हे सर्व कधी आठवणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, मुरांबा मालिकेत अभिनेता शशांक केतकर व अभिनेत्री शिवाणी मुंढेकर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. शशांक केतकरने अक्षय ही भूमिका साकारली आहे. तर शिवाणी मुंढेकरने रमा व माही अशी दुहेरी भूमिका साकारली आहे.