‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला श्री अर्थात अभिनेता शशांक केतकर नेहमी चर्चेत असतो. गेल्या अडीच वर्षांपासून शशांक ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली अक्षयची भूमिका देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

काही दिवसांपूर्वी शशांकने नवी कार घेतल्याची पोस्ट शेअर केली होती. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून अभिनेत्याने इलेक्ट्रिक कार खरेदी केली. त्यामुळे नेटकऱ्यांची शशांकचं खूप कौतुक केलं. पण त्याने ही इलेक्ट्रिक कार डिसेंबरमध्येच घेतली होती. तसेच त्याने या कार व्यतिरिक्त स्वतःचं नवं घर देखील घेतलं आहे, याचा खुलासा नुकताच शशांकने एका मुलाखतीमध्ये केला.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

हेही वाचा – Video: ‘पारु’ मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का? ‘जीव माझा गुंतला फेम’ पूर्वा शिंदेसह झळकणार ‘हे’ कलाकार

अभिनेता शशांक केतकर नुकताच ‘पुढारी’ या वृत्तसंस्थेच्या ‘शो कल्ला CAR’यामध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने नवं घर घेतल्याचा खुसाला केला. शशांक म्हणाला, “मी गाडी डिसेंबरमध्येच घेतली. आणखी एक खूप छान गोष्ट म्हणजे मी नवं घरही घेतलं आहे. मी त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले नाहीत. कारण मला सोशल मीडियावर सतत फोटो टाकायला आवडत नाही. काही घेतलं की टाका फोटो, हे आवडत नाही. आपल्या कुटुंबातच या गोष्टी साजऱ्या कराव्यात असं मला वाटतं.”

हेही वाचा – Bigg Boss 17: “बिग बॉसने माझी दोन घरं उद्ध्वस्त केली…”, पत्रकार परिषदेत मुनव्वर फारुकीचं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो मराठी चित्रपटांमध्येही झळकला आहे. तसंच आता तो हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे. हंसल मेहता यांच्या ‘तेलगी स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजनंतर तो करण जोहरच्या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.