‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या पर्वाचा महाअंतिम सोहळा ९ आणि १० नोव्हेंबरला पार पडला. यवतमाळची गीत बागडे ही महाविजेती ठरली आणि उपविजेता पदावर संगमनेरच्या सारंग भालके झाला. आता ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ची जागा ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धिंगाणा करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ १६ नोव्हेंबरपासून दर शनिवारी-रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. याचे प्रोमो सध्या व्हायरल झाले आहेत. यामध्ये अक्षय आणि रमाच्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर

‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षय रमाला प्रपोज करताना दिसत आहे. अक्षय म्हणतो, “चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी गोमुजी…” तेव्हा रमा म्हणते, “ये भुसनाळ्या…” त्यानंतर अक्षय म्हणतो, “आमच्या मनस्मितीची तू राज्ञी होशील का?”

तेव्हा रमा अक्षयला भन्नाट उत्तर देते. म्हणते, “शी..शी करत लव्हशिप कोण मागतं रे? जेवायचं…हात पुसायचं आणि तरातरा चालत जायचं.” त्यावर अक्षय विचारतो, “हे हात कपड्याला पुसायचे?” त्यावर रमा नाकात बोलते, “कुठेही पुसा पण पुसा.” हे ऐकून इतर सर्व कलाकारांना हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी वाजणार सनई-चौघडे

‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हा हा हा….ये भुसनाळ्या…भन्नाट भन्नाट…वरण भात तूप असलेल्या पुणेकरला घाटी ठसका दणक्यात दिलाय या पोरीनं…होऊ दे धिंगाणा…मनोरंजनाचा तीन पट धमाका.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “लयभारी, बघायला पाहिजे आता शनिवारी.”

हेही वाचा – अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या पहिल्या भागात ‘स्टार प्रवाह’वरील नायिका आणि नायकांमध्ये सांगीतिक लढत होणार आहे. ‘मुरांबा’ मालिकेतील अक्षय-रमासह ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील हृषिकेश-जानकी, ‘थोडं तुझं थोडं माझं’मधील तेजस-मानसी, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मधील अद्वैत-कला, ‘येड लागलं प्रेमाचं’मधील राया-मंजिरी तसंच आगामी नव्या मालिकेतील एक जोडी पहिल्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या पहिल्या भागात नायिका की नायक कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेच आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muramba fame shashank ketkar propose to shivani mundhekar on aata hou de dhingana season 3 pps