लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे मुरांबा(Muramba) ही मालिका आहे. या मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र रमा-अक्षय पुन्हा एकदा एकमेकांपासून दुरावणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अक्षय व रमा एका रस्त्यावर आहेत. ते एकमेकांकडे येत आहेत. अक्षयच्या हातात फुले दिसत असून दोघेही आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तितक्यात रमाच्या पाठीमागून एक गाडी वेगाने येते व ती रमाला धडक देते. रमा त्या गाडीच्या धक्क्याने हवेत उडते. अक्षय हे पाहताच तिला वाचवण्यासाठी जातो मात्र रमा तोपर्यंत पुलाखाली पडते. हे सर्व पाहिल्यानंतर रमा असे म्हणत अक्षय तिथेच बेशुद्ध पडलेला दिसत आहे. या सगळ्यात रमाला धडक मारलेली गाडी पुढे जाऊन थांबते. त्यातून एक मुलगा व एक मुलगी खाली उतरतात. रमाचा अपघात झालेल्या ठिकाणी येतात. ही मुलगी हुबेहुब रमासारखी दिसत असून तिचा पेहराव मात्र वेगळा दिसत आहे. ती मुलगी व तिच्याबरोबर असलेला मुलगा दोघेही घाबरलेले दिसत आहेत.

abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, “२०१९ ला जनतेने जो कौल दिला होता त्याच्याशी बेईमानी…”
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Muramba
Video: “आता राजा-राणीचा संसार…”, संकटावर मात करत रमा-अक्षय आले एकत्र; ‘मुरांबा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी म्हणाले, “कोणताच काटा…”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “रमा-अक्षयच्या आयुष्यात आलेली ही माही काय वळण देईल त्यांच्या नात्याला…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, गेले अनेक दिवस रेवाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षयने गेल्या दोन वर्षांतले काही आठवत नसल्याचे नाटक केले होते. त्यामुळे त्याला त्याची पत्नी रमापासून दूर राहावे लागले होते. अखेरीस रमाच्या मदतीने अक्षयने रेवाचे सत्य सर्वांसमोर आणले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता रमा-अक्षय अनेक दिवसांनी एकत्र आले असल्याचे पाहायला मिळत होते ते एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत होते. आता आता रमासारखीच हुबेहुब दिसणारी ही मुलगी माही त्यांच्या आयुष्यात येण्याने आता रमा-अक्षयच्या आयुष्यात काय बदल होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: “नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”

दरम्यान, मालिकेत शिवानी मुंढेकरबरोबर दिसणारा मुलगा अभिनेता रोहन गुजर आहे. रोहन गुजरची ‘मुरांबा’ मालिकेत एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत अक्षयची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर व रोहन गुजर यांनी याआधी ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत एकत्र काम केले आहे. आता या मालिकेत रोहनची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader