मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशांक केतकर. आपल्या दमदार अभिनयाने शशांकने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेंप्रमाणेच त्याच्या ‘मुरांबा’ मालिकेलादेखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘मुरांबा’ मालिकेत शशांकने साकारलेला अक्षय मुकादम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अशातच शशांकच्या लाडक्या लेकाचा गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेता शशांक केतकरला २१ डिसेंबर २०२० रोजी मुलगा झाला; ज्याचं नाव ऋग्वेद आहे. अजूनपर्यंत शशांकने ऋग्वेदला सगळ्यांसमोर आणलं नाही. त्याने सोशल मीडियाच्या जगापासून ऋग्वेदला लांब ठेवलं होतं. पण आता शशांकचा लाडका लेक सोशल मीडियाच्या जगात नुकताच आला आहे. त्याचं एक वेगळं कौशल्य पाहायला मिळत आहे.

Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Vivek Oberoi was last seen in Rohit Shetty's Indian Police Force. (Photo: Vivek Oberoi/ Instagram)
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते अचानक ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेर? नेमकं काय घडलं, जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी शशांक केतकरनं आपल्या लाडक्या लेकाचं सोशल मीडियावर अकाउंट उघडल्याचं जाहीर केलं. कारण साडे तीन वर्षांचा ऋग्वेद खूप छान फोटो काढतो. त्याच्या याच कलेला वाव देण्यासाठी शशांकने ऋग्वेदचं इन्स्टाग्रामवर अकाउंट उघडलं आहे. या अकाउंटवर ऋग्वेदने काढलेले सुंदर फोटो शेअर करण्यात येत आहेत.

नुकताच शशांकने ऋग्वेदचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋग्वेद बाबा शशांकचा फोटो काढताना दिसत आहे. पण, यामध्ये मोबाइलच्या मागे ऋग्वेदचा चेहरा लपलेला आहे. हा फोटो शेअर करत शशांकने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मी – आईला विचारलंस? फोन घेऊ का? ऋग्वेद – नाही…बाबा स्माइल कर…”

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली त्यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’, जोरजोरात ओरडत म्हणाले, “जयश्री आय लव्ह यू”

दरम्यान, ऋग्वेदच्या फोटोवर इतर कलाकार मंडळींसह शशांकच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गोड”, “खूप गोड”, “छान”, “ऋग्वेद लय भारी”, “आता तरी चेहरा दाखवं…उत्सुकता शिगेला पोहोचली आहे”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मधील १७ सदस्यांवर पडले भारी, जेलमध्ये न जाण्यासाठी काय-काय केलं? जाणून घ्या…

शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नाटक, मालिका, चित्रपटाच्या आणि वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उटवला आहे. मराठीसह हिंदीत आता तो खूप सक्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे लागोपाठ हिंदी प्रोजेक्ट केले आहेत. ‘तेलगी स्कॅम २००३’, ‘शोटाइम’नंतर ‘गुनाह’ हा त्याचा नवा वेब शो काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या वेब शोमध्ये शशांकसह अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला होता.

Story img Loader