स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेने आता नवं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रेवाने अक्षयला मारण्याचा प्रयत्न केला होता. रेवाने अक्षयला ऑफिसच्या गच्छीवरुन ढकलून देत त्याला जीवे मारण्याचा कट रचला होता. मात्र नशिब बलवत्तर म्हणून अक्षय एवढ्या मोठ्या घातपातातून बचावला.असं असलं तरी या सगळ्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अक्षयला रमा त्याची पत्नी असल्याचा विसर पडतो. मधल्या काळातल्या काही घटना आठवत नसल्याने अक्षय हॉस्पिटलमध्ये असतानाच रेवाला लग्नाची मागणी घालतो. मात्र कधी ना कधी अक्षयला भुतकाळ नक्की आठवेल या विश्वासावर रमा समोर आलेल्या आव्हानांना धीराने सामोरं जाते. या सगळ्यात निशिकांत मुकादम आणि रेवा,अक्षय रमापासून कसा लांब जाईल यासाठी रमाला हवं तितका त्रास देतात. मात्र रमा अक्षय आणि आर्थासाठी आलेल्या संकटात खंबीरपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करते.

या सगळ्या आव्हानांनंतर आता मालिकेने वेगळंच वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मुकादम कुटुंबाच्या घरी गणपती बाप्पा येण्याची लगबग सुरु झाली आहे.याच पार्श्वभूमीवर आता मालिकेत नवीन ट्वीस्ट आला आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. गणपतीच्या येण्याने रमा आणि अक्षय यांच्या नात्यातील दुरावा नाहीसा होणार असल्याचं दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, सणाच्या निमित्ताने मुकादम कुटुंबियांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ढोल ताशांच्या आवाजात बाप्पाचं स्वागत करताना रेवा अक्षयला म्हणते की, “आपण जोडीने गणपतीची पुजा करुयात”. मात्र तिच्या या बोलण्यावर अक्षय काहीच बोलत नाही.

mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा- Video : “गणबाई मोगरा…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स, मराठी लोकगीतावर थिरकले

हेही वाचा- Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

यादरम्यान गणपतीचं घरात आगमन होत असताना रमा अक्षयला मूर्ती सावरायला मदत करण्यासाठी रमा पुढे येते. तेव्हा अक्षय मनातल्या मनात म्हणतो की, “आता जोडीने दर्शन झालं”. त्यानंतर गणपतीसमोर हात जोडत अक्षय म्हणतो की, “तुला तर माहितच आहे ना ? हे सगळं मी का करतोय ते ? रमाने कणखर व्हावं आणि रेवाचं सत्य बाहेर यावं यासाठी या हे नाटक मी करतोय”. या प्रोमोमधून हे स्पष्ट झालं आहे की, रेवाने घडवून आणलेल्या अपघातात अक्षयची स्मृती गेली नसून त्याने काहीच आठवत नसल्याचं नाटक केलं होतं. रेवाचा विश्वास जिंकत बेसावध क्षणी तिला तिच्या सगळ्या पापांची शिक्षा मिळावी, यासाठी अक्षयने एवढं मोठं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. मालिकेचा हा महत्त्वाचा भाग येत्या ८ सप्टेंबरला दुपारी २ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे. गणपतीच्या शुभाशीर्वाद रमा आणि अक्षयच्या नात्यातील रेवा नावाचं संकट दूर होणार का ?, हे येत्या ८ सप्टेंबरला पाहता येणार आहे.

Story img Loader