स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेने आता नवं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रेवाने अक्षयला मारण्याचा प्रयत्न केला होता. रेवाने अक्षयला ऑफिसच्या गच्छीवरुन ढकलून देत त्याला जीवे मारण्याचा कट रचला होता. मात्र नशिब बलवत्तर म्हणून अक्षय एवढ्या मोठ्या घातपातातून बचावला.असं असलं तरी या सगळ्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अक्षयला रमा त्याची पत्नी असल्याचा विसर पडतो. मधल्या काळातल्या काही घटना आठवत नसल्याने अक्षय हॉस्पिटलमध्ये असतानाच रेवाला लग्नाची मागणी घालतो. मात्र कधी ना कधी अक्षयला भुतकाळ नक्की आठवेल या विश्वासावर रमा समोर आलेल्या आव्हानांना धीराने सामोरं जाते. या सगळ्यात निशिकांत मुकादम आणि रेवा,अक्षय रमापासून कसा लांब जाईल यासाठी रमाला हवं तितका त्रास देतात. मात्र रमा अक्षय आणि आर्थासाठी आलेल्या संकटात खंबीरपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा