Tanvi Malhara married to Pratham Mehta: २०२४ मध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी, हिंदी व मराठी सिनेविश्वातील कलाकार लग्नबंधनात अडकले. आता याच यादीत आणखी एका टीव्ही अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ ची मुख्य अभिनेत्री तन्वी मल्हारा हिने प्रथम मेहताशी लग्न केलं आहे. २८ वर्षीय तन्वीने प्रथमबरोबर आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांचा शाही विवाहसोहळा सध्या चर्चेत आहे. दोघांनी लग्नातील काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तन्वी लाल रंगाच्या भरतकाम केलेल्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तर प्रथमने या खास दिवसासाठी आयव्हरी रंगाचा पोशाख निवडला होता. तन्वीने लग्नातील फोटो शेअर केल्यावर चाहते त्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. करिश्मा तन्ना, अलिशा परवीनसह अनेक कलाकारांनी या दोघांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा फोटो –
प्रथम मेहता हा फोटोग्राफी डायरेक्टर आहे. त्याने ‘स्कॅम 1992’ आणि ‘मॉडर्न लव्ह’ सारख्या उल्लेखनीय प्रोजेक्ट्ससाठी काम केलं आहे.
हेही वाचा – सुकन्या मोनेंच्या लेकीची कमाल! परदेशात ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; जुलियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
तन्वी मल्हाराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिला ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ मधील कथा या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. यामध्ये कुणाल जयसिंग आणि अभिषेक मलिक यांच्याही भूमिका होत्या. पण ही मालिका फार कमी काळ प्रसारित झाली. जून २०२२ मध्ये सुरू झालेली मालिका कमी टीआरपीमुळे अवघ्या काही महिन्यातच बंद करण्यात आली. सावधान इंडियामध्येही तन्वीने काम केलं होतं.
© IE Online Media Services (P) Ltd