Surbhi Jyoti-Sumit Suri Got Married: ‘नागिन’ फेम टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने लग्नगाठ बांधली आहे. सुरभी तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीशी रविारी (२७ ऑक्टोबर रोजी) लग्न केलं. गेले काही दिवस या दोघांच्या लग्नाच्या सातत्याने चर्चा होत्या. अखेर दोघांचं लग्न निसर्गाच्या सानिध्यात पार पडलं. सुरभीने तिच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

सुरभी व सुमित बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचं लग्न हे डेस्टिनेशन वेडिंग होतं. शहरातील गर्दीच्या ठिकाणापासून दूर नॅशनल पार्कमध्ये त्यांनी लग्न केलं. ३६ वर्षीय सुरभीने लग्नासाठी देवभूमी उत्तराखंडची निवड केली. येथील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील एका रिसॉर्टमध्ये सुरभी अन् सुमित याचं लग्न पार पडलं.

Hemansh Kohli to get married
बॉलीवूड अभिनेता ३५ व्या वर्षी करणार अरेंज मॅरेज, मंदिरात बांधणार लग्नगाठ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
vivek oberoi shifts in new home on 14th wedding anniversary
लग्नाच्या १४ व्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश! विवेक ओबेरॉयचं पत्नीला खास गिफ्ट, प्रियांका आहे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या आयुष्यात आली प्राजक्ता! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिल्या शुभेच्छा; शिवाली परब म्हणाली…

लग्नासाठी सुरभीने लेहेंगा निवडला होता. त्याबरोबर तिने सुंदर मॅचिंग दागिने घातले होते. तर, सुमितने या खास दिवसासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली. रिसॉर्टमध्ये अत्यंत साधेपणाने त्यांचं लग्न पार पडलं. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व मोजकेच लोक उपस्थित होते.

Surbhi Jyoti Sumit Suri wedding photo
सुरभी ज्योती व सुमित सुरी यांचा लग्नातील फोटो (इन्स्टाग्राम)


शुभ विवाह ❤️
27/10/2024 असं कॅप्शन देत सुरभीने लग्नातील फोटो पोस्ट केले आहेत.

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?

सुरभी व सुमित दोघांना वैवाहिक आयुष्यासाठी चाहते व सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सुरभी व सुमित दोघेही मागील काही वर्षांपासून एकत्र आहेत. दोघांनी नातं जाहीरपणे स्वीकारलं नव्हतं. आता सुरभीने लग्नाची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. हे दोघेही एका म्युझिक व्हिडिओच्या शूट दरम्यान भेटले आणि तेव्हापासून सोबत आहेत आणि आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.

हेही वाचा – आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video

सुरभी ज्योतीचं काम

सुरभीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कबूल है’, ‘तनहाइयां’, ‘लौट के कोई आया है’, ‘इश्कबाज’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘ये जादू है जिन का’, ‘देव’, ‘लव्ह लूक व्हाट यू मेड मी डू’ या मालिकांसाठी सुरभी ओळखली जाते. ती ‘नागिन’ मालिकेतही होती. तसेच तिने अभिनेता गश्मीर महाजनीबरोबर ‘गुनाह’ या वेब सीरिजमध्येही काम केलंय.

Story img Loader