Superstar Son gave one Hit Movie in 9 Years: काही कलाकारांना सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, तर काहींना कौटुंबीक पार्श्वभूमी सिनेमांची असल्याने सहज काम मिळतं. असाच एक अभिनेता आहे, ज्याचे वडील सुपरस्टार आहेत. त्याचा भाऊदेखील आघाडीचा अभिनेता आहे पण त्या दोघांइतकं यश याला मिळालं नाही. या अभिनेत्याने ९ वर्षात फक्त एक हिट चित्रपट दिला आहे. तरीही तो कोट्यावधी रुपये मानधन घेतो. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अभिनेत्याचे नाव अखिल अक्किनेनी (Akhil Akkineni Career) आहे. ८ एप्रिल १९९४ रोजी अमेरिकेत जन्मलेला अखिल ३० वर्षांचा आहे. अखिल अक्किनेनी हा तेलुगू सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा आहे. तो लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्यचा (Akkineni Naga Chaitanya) धाकटा सावत्र भाऊ आहे. अखिल अवघ्या वर्षभराचा होता तेव्हा तो १९९५ मध्ये वडील नागार्जुन यांच्या ‘सिसिंदरी’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला होता.

गर्भपात करायला भाग पाडलं, फसवणूक केली; एक्स गर्लफ्रेंडने पुरावे दिल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात आरोपपत्र दाखल

मोठे झाल्यानंतरही अखिलने करिअर म्हणून अभिनय निवडला. त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. त्याने २०१५ मध्ये आलेल्या ‘अखिल’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्याचा हा पदार्पणाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न

अखिल अक्किनेनी त्याचे वडील नागार्जुन व आई अमाला यांच्याबरोबर (फोटो – इन्स्टाग्राम)

त्यानंतर अखिलचे ‘हॅलो’ आणि ‘मिस्टर मजनू’ हे चित्रपट रिलीज झाले पण तेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाही. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ हा त्याचा चित्रपट हिट झाला होता. त्याच्या ९ वर्षांच्या करिअरमधील हा एकमेव हिट चित्रपट आहे.

प्राजक्ता माळीच्या सिनेमातील नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील ‘या’ मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?

इतके फ्लॉप सिनेमे देऊनही अखिल चित्रपटासाठी निर्मात्यांकडून मोठी रक्कम मानधन म्हणून घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका चित्रपटासाठी तो जवळपास सात कोटी रुपये आकारतो. कोइमोईच्या वृत्तानुसार अखिलची एकूण संपत्ती ५९ कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagarjuna son naga chaitanya step brother akhil akkineni only one hit film in 9 years net worth hrc