हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहताने ‘बडे अच्छे लगते हैं ३’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. नकुल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. नकुल मेहता इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर विविध फोटो-व्हिडीओ शेअर करून तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतो. त्याने नुकताच शेअर केलेला डान्सर जेनिल मेहताबरोबरचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “राम सिया राम…” ‘आदिपुरुष’ चित्रपटातील नवे गाणे ऐकून प्रेक्षक म्हणाले “आम्ही धन्य झालो…”

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नकुल मेहता आणि डान्सर जेनिल दोघेही चक्क स्कर्ट घालून नाचताना दिसत आहेत. नकुल-जेनिलने रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रॉकस्टार’ चित्रपटातील “हवा हवा..” या गाण्यावर डान्स करीत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. नकुलच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत असून यावर सरगुन मेहता, करणवीर बोहरा यांसारख्या टीव्ही स्टार्सपासून त्याचे अनेक चाहते विविध प्रकारच्या कमेंट करीत आहेत.

हेही वाचा : “सॉरी…” IIFA पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टने मागितली माफी; म्हणाली ‘या’ कारणामुळे…

शेअर केलेल्या व्हिडीओला ‘मेन इन स्कर्ट्स’ अशी कॅप्शन देत नकुल म्हणाला, “जेनिलला मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर स्कर्ट घालून नाचताना पाहिले होते. त्यानंतर त्याचे व्हिडीओ पाहून मी त्याच्या कलेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा चाहता झालो.”

दरम्यान, नकुलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास “प्यार का दर्द है – मीठा मीठा, प्यारा प्यारा” या मालिकेद्वारे सुरू झाला होता. यानंतर त्याने ‘इश्कबाज’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘आय डोंट वॉच टीव्ही’, ‘नेव्हर किस योर बेस्ट फ्रेंड’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकांमध्ये काम केले. सध्या नकुल ‘बडे अच्छे लगते हैं ३’ मध्ये दिशा परमारबरोबर काम करीत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nakuul mehta dance on ranbir kapoor song wearing skirt shared video on instagram sva 00