‘शार्क टॅंक इंडिया’चा पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता नुकतंच या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमात नवीन व्यवसायिक त्यांच्या बिझनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटलं तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. नवीन व्यवसायांव्यतिरिक्त आता शार्क्समध्ये गुंतवणुकीवरून होणाऱ्या वाद विवादांनीही लक्ष वेधलं आहे.

या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अनुपम मित्तल आणि नमिता थापर यांच्यात गुंतवणुकीवरून वाद झाला आणि त्या भांडणात नमिताने ‘शार्क टॅंक २’च्या मंचावरून एग्झिट घेतली. या शोमध्ये नवीन एपिसोडमध्ये ‘नेस्टरूट्स’ या ब्रॅंडची मालकीण आली. हा ब्रॅंड विविध डिझाईन्सची भांडी, किचनमध्ये वापरले जाणारे विविध वस्तू बनवतो. तिने तिच्या व्यवसायाबद्दल दिलेली माहिती विनीता सिंगला आवडली आणि तिने तिच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी ऑफर दिली.

PM Narendra Modi to launch 2 warships and one submarine in Mumbai on Jan 15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र

आणखी वाचा : “ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी…,” नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत चिन्मय मांडलेकरचं रोखठोक मत

पण विनीताने हा करार करताना अनुपम मित्तल यालाही त्यात सहभागी केलं. विनीताने अनुपमबरोबर मिळून डील केल्याने अमन गुप्ता चिडला आणि “कधीतरी दुसऱ्या कोणालातरी घेऊन डील कर,” असं म्हणाला. विनीता त्याला प्रत्युत्तर करणार त्याआधीच अनुपमने “तू काहीही अधिकचं करत नाहीस. फक्त हिरोगिरी करतोस,” असं उत्तर अमनला दिलं. त्यांच्यातला वाद वाढला असतानाच पियुष बन्सल याने या वादात उडी मारली.

हेही वाचा : Shark Tank India 2: “आमच्यापैकी कोणीही हा शो…” अश्नीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुपम मित्तलची खरमरीत प्रतिक्रिया

पण अशातच अनुपमचं बोलणं नमिताला पटलं नाही आणि ती खुर्चीवरून उठली. त्यावर “तुला काय वाटतं याने काहीही फरक पडत नाही,” असं अनुपम तिला म्हणला आणि ती रागात मंचावरून निघून गेली. जाताना “तू तुझा राग नियंत्रणात ठेव. हे बरोबर नाहीये,” असं म्हणाली. आता हा प्रोमो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे आता त्यांच्यात नक्की काय वाद झाला हे आजच्या भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

Story img Loader