Shark Tank India 4: शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनमध्ये अनेक नवउद्योजक शार्क्सकडून डील मिळवण्यासाठी येत आहेत. ताज्या भागात एका जोडप्याने अंडरगारमेंट डिटर्जंट ब्रँडबद्दल माहिती दिली. यानंतर अनुपम मित्तल यांनी त्यांना विचारलं की त्यांनी कधी वॉशिंग मशीनबद्दल ऐकलं आहे का? समिक्षा आणि राहुल नावाच्या जोडप्याने शार्क टँक इंडियाच्या ताज्या एपिसोडमध्ये त्यांच्या अंडरवेअर डिटर्जंट ब्रँड उगीसबद्दल माहिती दिली. राहुल म्हणाला की त्यांचे हे प्रॉडक्ट खास अशा महिलांसाठी आहे, ज्यांना वॉशिंग मशिनमध्ये अंडरवियर धुवायला आवडत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुपम मित्तल या जोडप्याला म्हणाले, “तुम्ही वॉशिंग मशीनबद्दल ऐकलं आहे का? त्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारचे डिटर्जंट मिळतात; क्लीन, ग्रीन सगळे. त्यात थोडे अँटी बॅक्टेरियल लिक्विड टाका आणि तुमचं काम होतं. तुम्ही या सोप्या गोष्टी कठीण का करत आहात?” यावर राहुल व समिक्षाने शार्क्सना सांगितलं की हे प्रॉडक्ट त्यांनी महिलांसाठी आणलं आहे. अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना आपली अंतर्वस्त्रे इतर कपड्यांबरोबर धुवायला आवडत नाहीत. पाळीतही त्या आपली अंतर्वस्त्रे इतर कपड्यांबरोबर धुवू शकत नाही. यावर अनुपम म्हणाले की तुम्ही या गोष्टी आधीच बोलायला हव्या होत्या.

शार्क नमिता थापरने अशा प्रकारच्या डिटर्जंट्सची गरज आहे, हे मान्य केलं. तसेच अस्वच्छतेमुळे स्त्रियांमध्ये योनीमार्गाचे संक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे, कारण त्यांची अंतर्वस्त्रे नीट स्वच्छ नसतात, असंही तिने नमूद केलं. “तुम्ही हा अँगल निवडला असता, तर तुम्ही गुंतवणूकदारांना अधिक चांगल्या प्रकारे तुमचे मुद्दे पटवून देऊ शकले असते,” असं ती म्हणाली.

यानंतर राहुल व समिक्षा यांनी अडीच टक्के इक्विटीच्या (भागीदारी) बदल्यात ५० लाख रुपये मागितले. त्यानुसार उगीस कंपनीची व्हॅल्यूएशन २० कोटी रुपये झाली. या जोडप्याने सांगितलं की यावर्षी ४ कोटी रुपये नफा मिळवण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. यावेळी पीयुष बन्सलने त्यांना सल्ला दिला की त्यांनी लाँजरी ब्रँड्सबरोबर टायअप करावं. पण पीयुषने व रितेश अग्रवालने यात गुंतवणूक करण्यास नकार दिला.

नमिता म्हणाली की ती या डीलमधून माघार घेणार होती, पण नंतर तिने अमन गुप्ताबरोबर पिचर्सना ६% इक्विटीसाठी ५० लाख रुपयांची ऑफर दिली. तर अनुपम मित्तलने त्यांना ५% इक्विटीसाठी ५० लाख रुपयांची ऑफर दिली. नंतर त्यांनी वाटाघाटी करून इक्विटी ४ टक्के केली. या जोडप्याने अनुपमची ऑफर स्वीकारली आणि निघून गेले.