Namrata Sambherao Dance Video : मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून देखील नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नुकताच अभिनेत्रीने शेअर केलेला एका व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. यामध्ये नम्रता व तिचे पती योगेश संभेराव एकत्र थिरकताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलीकडच्या काळात अनेक ऑडिओ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक कोल्हापुरी हलगीचा ऑडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या पतीसह थिरकली आहे. या जोडप्याच्या जबरदस्त एनर्जीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नम्रताने ( Namrata Sambherao ) या व्हिडीओला “जागरण गोंधळ” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : …अन् रितेशने घेतली अंकिताची फिरकी! आधी केला Eliminationचा प्रँक, नंतर सल्ला देत म्हणाला, “कॅप्टन्सी हलक्यात…”

नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका

नम्रता संभेराव ( Namrata Sambherao ) व तिचे पती योगेश यांनी कोल्हापुरी हलगीवर जोडीने ठेका धरला आहे. सध्या इन्स्टाग्रामवर हलगीचा ऑडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व तितीक्षा यांनी एकत्र मिळून जबरदस्त डान्स केला होता. याशिवाय ‘पारू’ फेम शरयू सोनावणे देखील या ट्रेडिंग कोल्हापुरी हलगी ऑडिओवर थिरकली होती.

नम्रता व योगेश यांचा मराठमोळा अंदाज या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नम्रताने खास सुंदर साडी नेसून, नाकात नथ, गळ्यात गजरा असा लूक केला होता. या व्हिडीओमध्ये तिच्या लेकाची झलक देखील पाहायला मिळते.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणार नवी पौराणिक मालिका! देवदत्त नागे साकारणार भगवान शिवशंकर, तर अभिनेत्री आहे…; पाहा जबरदस्त प्रोमो

हेही वाचा : Video : शाहरुख-काजोलच्या सुपरहि गाण्यावर अभिजीत-निक्कीचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “ती कशीही असो पण…”

नम्रता संभेरावचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक ( Namrata Sambherao )

दरम्यान, नेटकऱ्यांनी नम्रता संभेरावच्या व्हिडीओवर लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आता कसे जुन्नरचे वाटतात… आपली संस्कृती आपली परंपरा”, “आपली संस्कृती, आपला अभिमान, आपला स्वाभिमान”, “मस्त नमा ताई”, “तू ऑलाराऊंडर आहेस”, “एक नंबर जोडी” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.