‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते. नम्रतानं अचूक विनोदी शैलीमुळे आणि सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान एक वेगळं निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं तिला ओळख मिळवून दिली आहे. नम्रता आपल्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच तिनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर कलाकारांची कशाप्रकारे रिहर्सल चालू आहे? याची इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.
नम्रता ही चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. कधी गातानाचे व्हिडीओ तर कधी सुंदर फोटो ती शेअर करतं असते. नुकतंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता प्रसाद खांडेकर यानं इन्स्टाग्रामवर नवीन अकाऊंट ओपन केलं आहे. त्यासंदर्भात नम्रतानं इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करून हास्यजत्रेची रिहर्सल कशी सुरू असते हे दाखवलं आहे.
हेही वाचा – स्पृहा जोशीनं फक्त एक दिवस केलेलं ‘हे’ काम; म्हणाली, “त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”
या व्हिडिओत, सुरुवातीला नम्रता म्हणते की, ‘हास्यजत्रेच्या सेटवर आमच्या रिहर्सल चालू आहेत. बघू कोण काय काय करतंय? समीर दा रिहर्सल करतोयस ना?’ तेव्हा समीर चौघुले म्हणतात, ‘हो.’ त्यावर नम्रता विचारते, ‘मोबाईल घेऊन?’ समीर म्हणतात, ‘नाही.’ त्यानंतर नम्रता प्रसाद खांडेकरला विचारते. ‘रिहर्सल करतोयस ना?’ त्यावर प्रसाद म्हणतो की, ‘नाही. आमची रिहर्सल झाली आहे. शूटिंग चालू होईल. पण मी आता माझं नवीन इन्स्टाग्राम अकाऊंट ओपन केलंय, जे माझं दोन महिन्यांपूर्वी बंद झालं होतं.’
पुढे नम्रता इशा डेकडे जाते. तेव्हा इशा फोन दाखवते आणि म्हणते, ‘आम्ही टाईमपास करत नाही. आम्ही प्रसादच्या नव्या इन्स्टाग्राम अकाऊंटच प्रमोशन करत आहोत. ‘तसेच ओंकार राऊत विचारल्यावर तो म्हणतो की, ‘मला मुली त्रास देतायत त्यांना मी रिप्लाय करतोय.’ यावेळेस प्रसाद म्हणतो की, ‘अरे तू माझं अकाऊंट प्रमोट करतोस ना.’ ओंकार म्हणतो, ‘नाही.’ त्यानंतर नम्रता स्वतःकडे कॅमेरा घेऊन म्हणते की, ‘ही आहे आमची हास्यजत्रेची रिहर्सल.’
हेही वाचा – “नाश्ता होईपर्यंत अचानक…”, दिग्पाल लांजेकरांना चाहत्यानं दिलं सरप्राइज; अनुभव सांगत म्हणाले…
दरम्यान, सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व कलाकार प्रसादच्या नव्या अकाऊंटला फॉलो करण्यासाठी आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत.