‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय झाला आहे. अनेक वर्ष या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. यातलीच एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजेच नम्रता संभेराव. हास्यजत्राच्या सेटवर नम्रता अनेकदा मजा मस्ती करताना दिसते. याचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नम्रताने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्रसाद खांडेकरची पोलखोल केली आहे.

नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रसादचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात प्रसाद आरश्यात बघून स्वतःचा सेल्फी काढताना दिसतोय. प्रसाद सेल्फी काढत असतानाच नम्रता हळूच त्याचा व्हिडीओ काढते आणि त्याला विचारते, “काय रे काय करतोयस.” यावर प्रसाद म्हणतो, “फोटो काढतोय, मेकअप केलाय तर जरा छान वाटतोय.”

हेही वाचा… ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेला मिळाला ‘हा’ पुरस्कार, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

नम्रता त्याला पुढे म्हणते, “शहाण्या, आम्ही मुली फोटो काढताना तुम्ही लगेच आम्हाला बोलता आणि आता तुम्ही स्वतःच्या सेल्फ्या बरोबर काढता.” यावर प्रसाद म्हणतो, “अगं ब्लर येतोय फोटो.” यावर नम्रता म्हणते, पण, काढतोयस ना आणि ब्लरच येणार, आम्हाला नावं ठेवता ना मग तुमचे फोटो ब्लरच येणार, सोप्पं नाहीय एवढं फोटो काढणं.”

Namrata Sambherao Prasad Khandekar

नम्रताने या व्हिडीओला कॅप्शनदेखील दिलं आहे. “ही तिचं मुलं आहेत, जी मुलींना सेल्फी काढताना नावं ठेवतात. रेडहॅंड पकडलं”, असं नम्रताने कॅप्शन देत लिहिलं आहे.

हेही वाचा… तब्बल २७ वर्षानंतर काजोल करणार ‘या’ सुपरस्टारबरोबर काम; चित्रपटाच्या शूटिंगला झाली सुरूवात

नम्रताची ही मजेशीर स्टोरी प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिपोस्ट केली आणि त्याला कॅप्शन देतं लिहिलं, “परवानगी नसताना एखाद्याचा लपून व्हिडीओ बनवणं हा गुन्हा आहे.”

नम्रता आणि प्रसादची मैत्री ही फार जुनी आहे. त्यांची अशी मजा मस्ती नेहमीच सुरू असते. नम्रताचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘नाचं ग घुमा’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आणि प्रेक्षकांचंही मन जिंकलं. या चित्रपटासाठी प्रसादने खास पत्र लिहून नम्रताला शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा… ब्रेकअपनंतर श्रुती हासनने पहिल्यांदाच सोडलं मौन; अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्याचा…”

दरम्यान, नम्रताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात नम्रता आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर सारंग साठ्ये, सुकन्या कुलकर्णी, मायरा वैकुल, सुप्रिया पाठारे आणि इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.