‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमुळे अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली अनेक वर्षे विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये नम्रताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नम्रताने वैयक्तिक आयुष्यात २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रुद्राज नावाचा गोंडस असा मुलगा आहे. बाळाचा जन्म झाल्यावर काम केव्हा सुरू केलं याबद्दल नम्रताने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आजूबाजूला मी अनेक जणी पाहिल्या ज्यांना गरोदरपणानंतर लगेच काम नाही करता आलं. यामुळे मधल्या काळात तीन ते चार वर्षांचा ब्रेक होतो. मला तसं नव्हतं करायचं मला लगेच कामाला सुरुवात करायची होती आणि यासाठी मला माझ्या सासूबाईंनी खूप जास्त पाठिंबा दिला.”

हेही वाचा : “सासऱ्यांनी एकच गोष्ट सांगितली…”, नम्रता संभेरावने कुटुंबीयांना दिलं यशाचं श्रेय; म्हणाली, “लग्न झाल्यानंतर…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आज माझ्या सासूबाई घरी आहेत म्हणून मी बाहेर काम शकतेय. गरदोर असताना सातव्या महिन्यापर्यंत मी हास्यजत्रा केलं आणि त्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर बरोबर चौथ्या महिन्यापासून मी कामाला सुरुवात केली. मला कामासाठीचा पहिला फोन गजेंद्र अहिरेंचा आला होता. ‘बिडी बाकडा’ नावाचा मी चित्रपट केला होता. तेव्हा रुद्राज फक्त दोन महिन्यांचा होता. तेव्हा मी योगेशला म्हटलं अरे कसं करायचं सरांचा फोन आलाय. तेव्हा माझा नवरा म्हटला ‘तुला करायचं ना? विषयही चांगला आहे तू कर आपण काहीतरी करूया.”

हेही वाचा : अखेर लग्नानंतर ऑस्ट्रेलियाला गेलेली पूजा सावंत दीड महिन्यांनी मुंबईत परतली; बहीण रुचिरा पोस्ट शेअर करत म्हणाली…

“मला सरांनी समोरून सांगितलं मी तिथे तुझी सगळी सोय करतो. सेटपासून जवळ तुला हॉटेल देतो. जेणेकरून यायला-जायला सोपं पडले. त्यावेळी मी, रुद्राज, आई, योगेश आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. रुद्राजची दुपटी, खिमटी असा एका बाळंतिणीचा संपूर्ण संसार घेऊन मी महिनाभर कोल्हापूरला राहिले. शूटिंग पूर्ण केलं या सगळ्यात मला योगेशने खूप मोठी साथ दिली. त्यानंतर मग पाचव्या महिन्यात मी हास्यजत्रा सुरू केलं.” असं नम्रता संभेरावने सांगितलं. आता लवकरच महाराष्ट्राची ही लाडकी अभिनेत्री ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namrata sambherao shares how she resume her work after birth of rudraj sva 00
Show comments