Nana Patekar : ‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी शोचे १५ वे पर्व सध्या सुरू आहे. या शोमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येतात. या वीकेंडला नाना पाटेकर या शोमध्ये हजेरी लावतील. या शोचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात ते स्पर्धक मिस्मी बोसू (Myscmme Bosu) हिच्याशी बोलताना दिसत आहेत.

प्रोमोमध्ये, नाना पाटेकर मिस्मीला विचारतात, “तुझा अंकशास्त्रावर विश्वास आहे?” तिने हो म्हटल्यावर हा शो कोण जिंकणार? असं नाना यांनी तिला विचारलं. हा प्रश्न ऐकताच मिस्मी गप्प होते, ती काहीच बोलत नाही. मग नाना तिला त्यांचं वय किती ते सांगायला विचारतात, यावेळी मिस्मी शोचा होस्ट आदित्य नारायणकडे बघताना दिसते.

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ

हेही वाचा – क्राइम, मिस्ट्री आणि थ्रिलरचा मिलाफ! या वीकेंडला नेटफ्लिक्सवरील पाहता येतील ‘हे’ गाजलेले चित्रपट

पुढे नाना हसत हसत म्हणतात, “तुझे हे अंकशास्त्र बकवास आहे. तू चांगलं गा, हेच सत्य आहे, बाकीचं सगळं सोडून दे.” नाना असं स्पष्ट बोलल्यामुळे मिस्मी व परीक्षकांच्या चेहऱ्याचे भावही बदलले होते. ‘नाना म्हणाले – गाण्यावर जर पूर्ण लक्ष असेल तर बाकी कशाची गरज नाही!’, असं कॅप्शन देऊन सोनी लिव्हच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – साता जन्माचे सोबती! रेश्मा शिंदे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो शेअर करत म्हणाली, “आयुष्याची…”

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी नाना बोलले ते योग्य असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी मिस्मीची बाजू घेतली. बऱ्याच जणांनी या व्हिडीओवर हसणारे इमोजीही कमेंट केले आहेत.

‘इंडियन आयडल’चे हे १५ वे पर्व असून श्रेया घोषाल, विशाल ददलानी व बादशाह हे परीक्षक आहेत. तर, आदित्य नारायण होस्ट आहे. हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होतो.

हेही वाचा : अखेर रेश्मा शिंदेच्या होणाऱ्या नवऱ्याचा पहिला फोटो आला समोर; त्याचं नाव काय? हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नाना पाटेकरांचा आगामी चित्रपट

नाना पाटेकर ‘वनवास’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गदर २’चा दिग्दर्शक अनिल शर्माने केलं आहे. यात दिग्दर्शकाचा मुलगा उत्कर्श शर्मा मुख्य भूमिकेत असून राजपाल यादव, सिमरत कौर व खुशबू सुंदर हेदेखील झळकणार आहेत. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होईल.

Story img Loader