नाना पाटेकर लवकरच ‘वनवास’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाना या शुक्रवारी ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये हजेरी लावणार आहेत. या शोचे काही प्रोमो समोर आले आहेत, ज्यामध्ये नाना पाटेकर होस्ट अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचे काही किस्से सांगताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केबीसीच्या एका विशेष भागात ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा हजेरी लावणार आहेत. या शोमध्ये नाना पाटेकर अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या शूटिंगच्या काही आठवणी सांगणार आहेत. या शोमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता करणे तसेच त्यांच्यासाठी निधी उभारणे हा नाना पाटेकर यांचा हेतू आहे.

हेही वाचा – “भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

‘नाना’ शब्दाशी संबंधित किस्सा

शोचे काही प्रोमो व्हायरल होत आहेत, त्यानुसार नाना पाटेकर यांनी एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. त्यांनी ‘नाना’ शब्दाशी संबंधित एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, “आम्ही ‘कोहराम’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमितजी आले आणि सगळ्यांना मिठाई देऊ लागले. मी त्यांना विचारलं की कशाबद्दल मिठाई देताय? त्यावर ते म्हणाले, “माझ्या मुलीला बाळ झालं, मी ‘नाना’ (आजोबा) झालो!” त्यावर त्यावर नाना यांनी मिश्किल टिप्पणी केली. “तुम्ही आता इतक्या वर्षांनी नाना झालात, मी तर जन्मापासूनच नाना आहे,” असं ते म्हणाले होते.

हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

केबीसीच्या सेटवर ‘वनवास’ चित्रपटाची टीम (फोटो – पीआर)

बिग बींनी भेट दिलं शर्ट

गप्पा मारताना नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित आणखी एक आठवण शेअर केली. ते म्हणाले, “एक दिवस अमितजी एक छान शर्ट घालून आले होते. मी त्यांना सांगितलं की शर्ट छान आहे. तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे.”

नाना आणि अमिताभ बच्चन यांच्या मजेदार गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला शुक्रवारी रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर पाहता येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar says amitabh bachchan gifted him shirt kaun banega crorepati 16 updates hrc