नारायणी शास्त्री ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ४५ वर्षीय नारायणीने तिच्या जवळपास २५ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत केसरची भूमिका साकारून लोकप्रियता मिळविणाऱ्या नारायणीने ‘पिया का घर’, ‘कोई अपना सा’, ‘आप की नजरों ने समझा’, ‘पिया रंगरेझ’ अशा खूप मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या ती ‘लाल बनारसी’ मालिकेत काम करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायणी तिच्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली. नारायणी अभिनेता अनुज सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती अभिनेता गौरव चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी नच बलिये २ मध्ये भागही घेतला होता. पण त्यांचं ब्रेकअप झालं आणि मग २०१५ मध्ये तिने स्टीव्हन ग्रेव्हरशी लग्न केलं. “आम्ही भावंड लहानपणी खूप शांत होतो, कधीच गोंधळ घालायचो नाही, आईला त्रास द्यायचो नाही,” असं भावंडांबाबत नारायणी एका मुलाखतीत म्हणाली.

“त्याने माझ्या सर्व एक्स बॉयफ्रेंड्सना…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “आमचं ब्रेकअप झालं तरी…”

नारायणीचा जन्म पुण्यातला आहे. तिचे वडील उत्तर प्रदेशचे असून तिची आई रुक्मिणी शास्त्री मराठी आहे. नारायणीचे वडील रमेश शास्त्री हे मूळचे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचे होते, याबाबत तिनेच सांगितलं होतं. “माझे वडील अलाहाबादचे (आताचे प्रयागराज) होते आणि लहानपणी मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथे जायचे. माझी आई महाराष्ट्रीय आहे, पण तिने शुद्ध हिंदी खूप लवकर शिकली त्यामुळे घरी आम्ही हिंदी बोलायचो. खरं तर, मला मराठी नीट येत नाही पण खूप छान हिंदी येते. त्यामुळे मला माझ्या कामात खूप मदत झाली आहे. बऱ्याच लोकांना माझी भाषा ऐकल्यावर मी मुंबईची नाही, यावर विश्वास बसत नाही,” असं नारायणीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

नारायणी शास्त्रीला एक भाऊ असून त्या पाच बहिणी आहे. नारायणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या मालिकेच्या सेटवरील फोटो व व्हिडीओ, रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या पतीबरोबरचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayani shastri reveals her father was from allahabad mother is maharastrian hrc