Elvish Yadav Chum Darang Controversy : ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता व लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादव कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत येत असतो. सध्या चुम दरांगसंदर्भात केलेल्या विधानावरून एल्विश वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोगाने ( NCW ) दखल घेत एल्विशला नोटीस बजावली आहे.
एल्विश यादवने स्वतःच्या पॉडकास्टमध्ये चुम दरांगचं नाव घेत आक्षेपार्ह विधान केलं होतं. तेव्हापासून एल्विशला ट्रोल केलं जात आहे. एल्विश म्हणाला होता की, करणवीरला नक्कीच करोना झाला होता. नाहीतर चुम कोणाला आवडेल? एखाद्याची पसंती इतकी कशी काय खराब असू शकते? नाव चुम आहे, पण काम ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये केलं आहे. तिच्या नावातच अश्लीलता आहे.
एविल्शच्या याच विधानाविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. १७ फेब्रुवारीला एल्विशला राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहण्यास सांगितलं आहे. एल्विशने केलेलं विधान अपमानास्पद असून वर्णभेद केल्याचं एनसीडब्ल्यूने म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष केंजुम पाकम म्हणाल्या, “एल्विश यादवचं हे विधान फक्त चुम दरांगचा नाही तर सगळ्या ईशान्य भारतीय महिलांचा अपमान करणार आहे.” त्यामुळे एल्विशवर कठोर कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे.
एल्विशच्या विधानावर चुम दरांगची प्रतिक्रिया
चुम दरांगने सोशल मीडियावर पोस्ट लिहित एल्विशच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. तिने म्हटलं होतं की, एल्विशने मर्यादेची सीमा ओलांडली आहे. हा विनोद फक्त माझाचं अपमान करणारा नसून मेहनत करणारे निर्माते संजय लीला भन्साळी यांचा अपमान करणारा होता.
दरम्यान, एल्विश यादव सध्या दोन लोकप्रिय कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. ‘रोडीज डबल क्रॉस’ आणि ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमात एल्विश काम करताना दिसत आहे.