‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा २३ डिसेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

अभिनेता कश्यप परुळेकरने काल मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसांचा व्हिडीओ शेअर केला होता. “‘नवा गडी नवं राज्य’ अध्याय समाप्त…कळावे, लोभ असावा…” असं कॅप्शन लिहीत कश्यपने शूटिंगच्या शेवटचा दिवसांचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर मालिकेच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Premachi Goshta: मुक्ता सागरच्या लग्नाचं सत्य कळताच सावनी भर कार्यक्रमात करणार गौप्यस्फोट

कश्यपच्या व्हिडीओवर ‘मालिका बंद करू नका’, ‘मालिकेचा दुसरा भाग लवकर आणा’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकरीने लिहिलं आहे, “पण का? अर्धवट मालिका आहे. बंद करू नका.” तसंच दुसऱ्या नेटकरीने लिहिलं, “तुम्ही नवीन मालिका सुरू करा प्लीज.” तसेच तिसऱ्या नेटकरीने लिहिलं, “काय यार…मालिका खूप छान आहे. बंद नका करू.” अशा अनेक प्रतिक्रिया कश्यपच्या व्हिडीओवर प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: संगीत सोहळ्यातील इंद्रा-जयंत यांचा सरप्राईज डान्स पाहून मुक्ता-सागरमध्ये होणार वाद, नेमकं काय घडणार? वाचा…

दरम्यान, श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली होती. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. रमाचा संसार सांभाळणारी आनंदी घराघरात पोहोचली. रमा-राघवच्या संसारात आलेला हा नवा गडी म्हणजेच आनंदीचं काही काळाने नवं राज्य पाहायला मिळालं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि अधिराज्य करू लागली. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. २३ डिसेंबरला ‘नवा गडी नवं राज्य’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Story img Loader